Friday, August 14, 2020

शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात

विविध व्यवसाय अभ्यासक्रमास प्रवेश सुरु

नांदेड दि. 14 :- येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र या शासकीय संस्थेत इयत्ता दहावी उत्तीर्ण, दहावी एटीकेटी विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

अभ्यासक्रम इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, ॲटोमोबॉईल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी शैक्षणिक वर्षे 2020-21 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपनीत नौकरीची संधी प्राप्त होते. मर्यादीत जागा असल्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, भारत गॅस एजन्सी समोर बाबानगर, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे मुख्याध्यापक जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.

00000


 

108 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी

 116 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  शुक्रवार 14  ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 108 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 116 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 50 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 66 बाधित आले.

 

आजच्या एकुण 830 अहवालापैकी  700 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 815 एवढी झाली असून यातील 2 हजार 225 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 432 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 132 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

11  ऑगस्ट रोजी  किनवट तालुक्यातील शनिवार पेठ येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा, 12 ऑगस्ट रोजी नंदीग्राम सोसायटी नांदेड येथील 53 वर्षाच्या एका पुरुषाचा, 13 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर मुखेड 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, वंजारवाडी नायगाव येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर 14 ऑगस्ट रोजी लोहा येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे, मुखेड तालुक्यातील जांभ येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा मुखेड कोविड केअर सेंटर येथे येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 140 एवढी झाली आहे.    

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 9, लोहा तालुक्यात 6, नायगाव 2, बिलोली 2, कंधार 1 , मुदखेड 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड 5, हदगाव 2,  देगलूर 12, किनवट 1, परभणी 1, निजामाबाद 3 असे एकुण 50 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, अर्धापूर 3, बिलोली 2, लोहा 2, धर्माबाद 14, कंधार 1, नांदेड ग्रामीण 10, भोकर 2, देगलूर 1, किनवट 1, मुखेड 8, यवतमाळ 1 असे एकुण 66 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 432 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 198, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 507, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 39, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 47, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 32, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 102, लोहा कोविड केअर सेंटर येथे 22, हदगाव कोविड केअर सेंटर 31, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, किनवट कोविड केअर सेंटर येथे 37, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 17, मुदखेड कोविड केअर सेटर 24, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 8, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, बारड कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 132 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 184,

घेतलेले स्वॅब- 27 हजार 627,

निगेटिव्ह स्वॅब- 21 हजार 475,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 116,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 815,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 140,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 225,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 432,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 826, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 132.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकिय कार्यक्रमात

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

नांदेड, दि. 14 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73  व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.  

कोविड-19 ची परस्थिती लक्षात घेता हा समारंभ मर्यादित उपस्थितीत व सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करुन साजरा होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

000000


पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी

काबरा कुटुंबियांचे केले सांत्वन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-   स्व. रामनारायणजी काबरा हे अतिशय निर्मळ आयुष्य जगले. नांदेडच्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी  तळमळीने त्यांनी काम केले. शेवटपर्यंत त्यांनी आपला निरपेक्ष  बाणा जपत दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांची सदैव तळमळ असायची या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.

स्व. रामनारायणजी काबरा यांच्या घरी जाऊन त्यांनी परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.  यावेळी श्रीमती सुशिलाबाई काबरा, प्रेमकुमार काबरा, संजय काबरा, शोभा बियाणी, नवीन काबरा, अमित काबरा, संकेत काबरा, कृष्णा काबरा, श्रीनारायण बियाणी व समस्त काबरा परिवार उपस्थित होते. काबरा परिवाराशी चव्हाण कुटूंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सांत्वन भेटीत श्रीमती सुशिलाबाई काबरा यांनी रामनारायण यांच्या स्मरणार्थ संत रामचंद्र केशव डोंगरे महाराज यांचा भागवत नवनीत ग्रंथ काबरा परिवाराच्यावतीने पालकमंत्री श्री. चव्हाण यांना भेट दिला.

00000

 



  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...