Thursday, July 16, 2020


वृत्त क्र. 657   
कोरोनातून आज 27 व्यक्ती बरे
11 बाधितांची भर तर एका महिलेचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 16 :-  जिल्ह्यात आज 16  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 27 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नवीन 11 बाधित व्यक्तींची भर पडली असून वाजेगाव येथील 63 वर्षाच्या एका बाधित महिलेचा शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या महिलेस उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह व श्वसनाचे आजार होता. आजच्या एकूण 219 अहवालापैकी 186 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 743 एवढी झाली आहे. यातील 439 बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 40 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 27 बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 17, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 4, किनवट कोविड केअर सेंटर येथील 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1,  डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयातून 2 बाधितांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये  वाजेगाव येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील विकासनगर येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, किनवट तालुक्यातील सिध्दार्थनगर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष व 50 वर्षाची 1 महिला, देगलूर तालुक्यातील भायेगावरोड येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील गोजेगाव येथील 29 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर बापुनगर येथील 32 व 65 वर्षे वयाच्या 2 महिला तर मुखेड तालुक्यातील अशोकनगर येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, लोहा तालुक्यातील मोंढा परिसरातील 72 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. 
आज रोजी 264 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 10 महिला बाधित व 12 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 299 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
आज रोजी एकुण 743 बाधितांपैकी 40 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 439 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 264 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 58, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 72, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 14, जिल्हा रुग्णालय येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 32, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 15, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 2, लोहा कोविड केअर सेंटर येथे 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 1 तसेच खाजगी रुग्णालयात 38 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 99,
घेतलेले स्वॅब- 9 हजार 121,
निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 437
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 11
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 743,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,
मृत्यू संख्या- 40,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 439,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 264,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 299.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.        
00000


वृत्त क्र. 656   
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 37.81 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात गुरुवार 16 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 604.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 314.53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35.29 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुलै 2020 सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 74.63 (381.07), मुदखेड- 36.67 (246.67),
अर्धापूर- 80 (319.67), भोकर- 33.75 (332.98), उमरी- 18 (229.29), कंधार- 47.17 (218.00), लोहा- 50.83 (312.99), किनवट-14.29 (315.96), माहूर-14.50 (307.75), हदगाव 5.57 (301.29), हिमायतनगर- 8.33 (514.99), देगलूर- 45.33 (277.60), बिलोली- 42 (295.00), धर्माबाद- 37.66 (345.98), नायगाव- 63.60 (289.20), मुखेड- 32.57 (343.98). आज अखेर पावसाची सरासरी 314.53 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5032.42) मिलीमीटर आहे.
000000


वृत्त क्र. 655   
शेतकऱ्यांनी उपकर योजनेत
कृषि साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत
               कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर
नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्हा परिषदेच्या उपकर  योजनेंतर्गत अनुदानावर कृषि  साहित्याचा लाभ  घेण्यासाठी गरजू शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे.   
शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत अनुदानावर डी.बी.टी. व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), दोन ते चार फाळी पल्टी नांगर व पॉवर टिलर इत्यादी कृषि साहित्य, यंत्राचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
औजार निहाय देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे. बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअरसाठी देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 2  हजार रुपये तर एकूण लाभ दयावयाची लाभार्थी संख्या 250 एवढी आहे. ताडपत्रीसाठी अनुदान 2  हजार रुपये, एकुण 400 लाभार्थी.  3 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संचासाठी अनुदान 10 हजार रुपये, एकुण 53 लाभार्थी. 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच अनुदान 15 हजार रुपये एकूण 53 लाभार्थी. पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) साठी अनुदान 15 हजार रुपये एकूण 136 लाभार्थी. दोन ते चार फाळी पल्टी नांगरासाठी किंमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त 40 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान, एकूण 12 लाभार्थी तर पॉवर टिलरसाठी अनुदान 50 हजार रुपये प्रति औजार याप्रमाणे असून एकूण 8 लाभार्थ्यांची संख्या आहे.
या योजनेंतर्गत औजाराचा, कृषि साहित्याचा लाभ घेणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.   शेतकऱ्यांचा अर्ज, स्वत:चे नावे जमीन असल्याबाबत चालू आर्थिक वर्षाचा सात/बारा 8- (होल्डींग) चा उतारा, आधार सलग्न बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकीत प्रत, शेतकऱ्याकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाचे प्रमाणपत्र (कडबा कटरचा लाभ घेणेसाठी) ओलीताची सोय (विहीर/शेततळे/नाला) असल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी). अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबत लाईट बिलची छायांकि प्रत अथवा कोटेशन भरलेल्या पावतीची छायांकि प्रत. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी) ट्रॅक्टरच्या आर.सी. बुकची छायांकीत प्रत. (दोन ते चार फाळी पल्टी नांगराचा लाभ घेणेसाठी) जातीच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकि छायांकि प्रत. (लाभार्थी शेतकरी मागास वर्गीय असल्यास), दिव्यांग असल्यास प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.  
000000


वृत्त क्र. 654   
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार 17 जुलै 2020 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व नांदेड येथे मुक्काम.  
0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...