Thursday, November 15, 2018


वृद्ध कलावंतांनी बँक खाते
माहिती पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- वृद्ध कलावंताचे मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जाते. काही वृद्ध कलावंत लाभार्थ्यांचे बँकेचे खाते क्रमांक किंवा शाखा क्रमांक चुकीचे असल्याने लाभार्थ्यांचे मानधन बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीनेजमा करण्यात अडचण येते. म्हणून वृद्ध कलावंतांनी मानधनासाठी त्यांच्या बँक खात्याचा बारा किंवा अठरा क्रमांक व आयएफएस कोड, खात्याच्या पासबुक सत्यप्रतीसह सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्या mahacultureabd@gmail.com  इमेलवर तत्काळ पाठवावा,असे आवाहन सहायक संचालक विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.
******


अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील
लोकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 15 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांचेमार्फत सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांच्या आर्थिक विकासासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊ इच्छूक असणाऱ्या विद्यार्थीसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्राची पुर्तता करुन विहित नमुन्यात अर्ज सोमवार 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) नांदेड यांनी केले आहे.  
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – अर्जदार अनुसूचित जाती / नवबौद्ध संवर्गातील असावा. जातीचा दाखला उपजिल्हाधिकरी / तहसिलदार यांचा असावा. शाळा सोडल्याचे मुळ प्रमाणपत्र टि.सी., उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांचा असावा. पासपोर्ट फोटो-2, राशनकार्ड / आधार कार्ड / इलेक्शन कार्ड, अर्जाचा नमुना.
प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या ट्रेडचे नाव पुढील प्रमाणे राहील. टु व्हीलर सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, डिप्लोमा इन जीएसटी, संगणक प्रशिक्षण, फेब्रिकेटर / वेल्डींग, वाहन चालक, मोबाईल रिपेअर सर्व्हिस सेंटर, फॅशन डिझायनिंग, रेफ्रिजरेशन ॲड एअर केडिशनर रिपेअर, मोटार रिवायडिंग, रिटेल मॅनेजमेंट हे राहतील.
000000


रास्तभाव धान्य दुकानात
ऑक्टोंबर महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 15 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने ऑक्टोंबर 2018 साठी नियमित नियतन साखर प्राधान्य कुटुंब योजनेसाठी प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 3 हजार 865 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड - 536.50, हदगाव- 452.0, किनवट- 237.50, भोकर- 159.00, बिलोली- 191.50, देगलूर- 220.00, मुखेड- 433.00, कंधार- 320.00, लोहा- 324.00, अर्धापूर- 114.50, हिमायतनगर- 138.00, वाई माहूर- 113.50, उमरी- 126.00, धर्माबाद- 90.00, नायगाव- 271.50, मुदखेड- 138. याची सर्व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून या परिमानानुसार मंजुर साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.
0000000


नदीपात्र परिसरातील
प्रतिबंध आदेश तुर्तास स्थगित
नांदेड, दि. 15 :- विटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक यांना नांदेड जिल्हा हद्दीतील वाहणाऱ्या सर्व नदीपात्रापासून 500 मीटरच्या आत दोन्ही बाजूनी नदी काठालगत असणाऱ्या खाजगी / शासकीय मालकीच्या शेतामध्ये माती उत्खनन करण्यास प्रतिबंधाचे आदेश जिल्हादंडाधिकारी लहुराज माळी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 पोटकलम 5 नुसार तुर्तास स्थगित केला आहे.  
0000000


जागतिक मधुमेह दिन व सप्ताहनिमित्त
मधुमेह तपासणी शिबीर संपन्न
नांदेड, दि. 15 :- जागतिक मधुमेह दिन व सप्ताहनिमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह तपासणी व उपचार शिबीर नुकतेच घेण्यात आले. या शिबिरात 30 वर्षे व त्यावरील वयोगटातील स्त्री-पुरुष व ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. दीपक हजारी व डॉ. रहेमान यांनी रुग्ण व नातेवाईकांना आहार, दिनचर्या व मधुमेह वरील उपचाराबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. रहेमान, डॉ. कुलदीपक, डॉ. दीपक गोरे, डॉ. बालाजी माने, डॉ. अर्चना तिवारी, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. अनुप्रिया गहिरवार आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व संतोष बेटकर यांनी परिश्रम घेतले. या सप्ताहानिमित्त प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात येणार असून याचा लाभ वय वर्ष 30 व त्यावरील वयोगटातील सर्व स्त्री-पुरुष व जेष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.  
000000


जंगमवाडी, तरोडा नाका परिसरातील
11 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
15 हजार 100 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 15 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील जंगमवाडी व तरोडा नाका परिसरात आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 11 तंबाखू विक्रेत्यांकडून 15 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा संतोष बेटकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नेहरकर तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
00000


राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष
जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
नांदेड दि. 15 :- पौष्टीक तृणधान्य पिकाचे महत्व जनमानसांना पटण्यासाठी शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हा फळरोपवाटीका धनेगाव येथे पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सदर पिकाच्या आहारातील महत्वाबाबत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील पारंपारिक पीक रचनेत ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर तृणधान्ये ही महत्वाची पीके आहेत. वातावरणाचा ताण सहन करुन कोरडवाहू व दुर्गम क्षेत्रात विपरित परिस्थितीत ही पिके शेतकऱ्यांना उत्पादन देतात. पारंपारिक पद्धतीत दैनंदिन आहारात या तृणधान्याचे सेवन नित्याचे होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आहारातून या तृणधान्याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. पर्यायाने शेतकरी सुद्धा कालपरत्वे या पिकांपासून दूर गेले आहेत.
बदलत्या जीवनशैलीतील वाढत्या ताण-तणावामुळे व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्य विषयक समस्या जसे मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षय, दमा, कर्करोग आदी विकार सध्या विविध वयोगटात निदर्शनास येत आहेत. यासाठी राष्ट्रीयस्तरावर नेमलेल्या अभ्यास गटाचे निष्कर्षाचे आधारे केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्ये व त्याद्वारे पौष्टिक आहारावर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यास अनुसरुन, केंद्र शासनाने या पिकांचे आहारातील महत्व विचारात घेता ज्वारी, बाजरी, रागी व इतर लघू तृणधान्य पिके जसे वरई, राळा, बार्टी, कोंद्रा, सावा, राजगिरा यांना 13 एप्रिल 2018 च्या अधिसुचनेद्वारे पौष्टीक तृणधान्य पिके म्हणून घोषित केले आहे असून सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
या तृणधान्यात ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) चे प्रमाण कमी असल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. त्यातील पौषक गुणवत्वे विचारात घेता मधुमेह, कर्करोग, ह्दयरोग, आतडयाचे रोग प्रतिबंधित करण्याची क्षमता असल्याचे संशोधनांती सिद्ध झले असल्याने स्वास्थ आहारात पौष्टीक अन्नधान्याचे महत्व समजते.
पौष्टीक तृणधान्य पिकाचे महत्वाबाबत कृषि विभागाबरोबरच शासनाचे इतर विभागही प्रयत्नशील असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयाच्या माध्यमातून पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000


"राष्ट्रीय पत्रकार दिन" कार्यक्रमाचे
एमजीएम महाविद्यालयात आयोजन
नांदेड, दि. 15 :- राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात "राष्ट्रीय पत्रकार दिन" सकाळी 10.30 वा. साजरा करण्यात येणार आहे.  
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांचे डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय प्रेस परिषदेने डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हानहा विषय यावर्षी दिला आहे. सर्व संपादक, माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...