Thursday, November 15, 2018


अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील
लोकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 15 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांचेमार्फत सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांच्या आर्थिक विकासासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊ इच्छूक असणाऱ्या विद्यार्थीसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्राची पुर्तता करुन विहित नमुन्यात अर्ज सोमवार 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) नांदेड यांनी केले आहे.  
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – अर्जदार अनुसूचित जाती / नवबौद्ध संवर्गातील असावा. जातीचा दाखला उपजिल्हाधिकरी / तहसिलदार यांचा असावा. शाळा सोडल्याचे मुळ प्रमाणपत्र टि.सी., उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांचा असावा. पासपोर्ट फोटो-2, राशनकार्ड / आधार कार्ड / इलेक्शन कार्ड, अर्जाचा नमुना.
प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या ट्रेडचे नाव पुढील प्रमाणे राहील. टु व्हीलर सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, डिप्लोमा इन जीएसटी, संगणक प्रशिक्षण, फेब्रिकेटर / वेल्डींग, वाहन चालक, मोबाईल रिपेअर सर्व्हिस सेंटर, फॅशन डिझायनिंग, रेफ्रिजरेशन ॲड एअर केडिशनर रिपेअर, मोटार रिवायडिंग, रिटेल मॅनेजमेंट हे राहतील.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...