Tuesday, July 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा
गुरुवारी अग्रवाल यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय धिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड" हिमेअतंर्गत गुरुवार 5 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते सायं 5.30 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे "इंग्रजी" या विषयावर पुणे येथील विषयतज्ज्ञ रत्नेश अग्रवाल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


कंधार, मुखेड येथील
आरटीओ शिबिराच्या तारखेत बदल
 नांदेड दि. 3 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दरमहा आयोजित केले जाणाऱ्या मासिक शिबिराच्या कामकाजामध्ये कंधार व मुखेड येथील तारखेत संगणकीत तांत्रिक अडचणीमुळे बदल करण्यात आला आहे.
कंधार येथील जुलै 2018 मधील शिबिर 7 जुलै ऐवजी 5 जुलै 2018 ला व मुखेड येथील जुलै 2018 मधील 5 जुलै ऐवजी 7 जुलै 2018 रोजी मासिक शिबीर होणार आहे. याची कंधार व मुखेड तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
आज बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार बुधवार 4 जुलै 2018 रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी , असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.    
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात बुधवार 4 जुलै 2018 रोजी  दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.
00000


महात्मा फुले विकास महामंडळाच्या
योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). नांदेड यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या महामंडळाच्या नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2018  पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
सन 2018-19 या वर्षासाठी उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. इच्छूक लाभार्थीनी अर्ज ऑनलाईन www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर दाखल करावे व सॉफ्ट कॉपी सोबच्या कागदपत्रासह कार्यालयात दाखल करावे. महामंडळाच्यावतीने 50 टक्के अनुदान योजनेचे 400 भौतिक उद्दीष्ट दिले असून प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये आहे. प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीतजास्त 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. बीज-भांडवल योजनेसाठी (उद्दीष्ट 300 भौतीक) प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 5 लाखापर्यंत आहे. प्रकल्प मर्यादा 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी 4 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येते. यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड समान हप्त्यात तीन ते पाच वर्षात करावी लागते, यात अर्जदाराचा सहभाग 5 टक्के आहे. 
या योजनांसाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे राहतील. अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त सावे. जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला दाखला, उत्पन्न शहरी ग्रामीणसाठी 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायनुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले जसे वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी, अधारकार्ड व पॅनकार्ड जोडावेत.
लाभार्थीने यापूर्वी महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच तो कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुनच अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात 30 सप्टेंबर 2018 पूर्वी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. एका व्यक्तीने एकाच योजनेमध्ये अर्ज करावा. त्रस्थ व्यक्तीमार्फत अर्ज स्विकारले जाणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकानी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक, पूर्व बायपास रोड, ग्यानमाता इंग्लीश स्कूल समोर, नांदेड येथे संपर्क साधावा.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...