Thursday, October 21, 2021

 भरडधान्य खरेदी नोंदणीस मुदतवाढ 

नांदेड (जिमाका), दि. 21 :- शासन आदेशान्वये हंगाम 2021-22 मधील धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीस रविवार 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात बिलोली, भोकर, नांदेड/अर्धापूर, धर्माबाद, नायगाव, देगलूर, उमरी, हिमायतनगर, कंधार, लोहा, मुखेड, हदगाव या खरेदी केंद्रावर हंगाम 2021-22 मधील धान व भरडधान्य खरेदीस 15 ऑक्टोंबर पर्यंत शेतकरी नोंदणीस शासनाने यापुर्वी मुदत दिली होती. त्यास आता 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात 5 जण बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 754 अहवालापैकी 5अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 368 एवढी झाली असून यातील 87 हजार 693 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 48 हजार 144

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 44 हजार 575

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 368

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 693

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, (जिमाका) 21 :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)  30 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 57 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 10 ते सायंकाळी 4.30  वाजेपर्यंत  दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे. 

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

सुधारीत वृत्त

पोलीस स्मृती दिनानिमित्त मान्यवरांचे अभिवादन

नांदेड, (जिमाका) 21 :- कायदा व सुव्यवस्था, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व इतर राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतांना पोलीस खात्यातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून विरगती प्राप्त केली आहे. यावर्षी संपूर्ण भारतातून सुमारे 377 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना विरगती प्राप्त झाली. आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज शहीद पोलीसांना श्रद्धांजली अर्पण करून स्मृती स्तंभास अभिवादन केले. 

पोलीस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावर्षी शहीद झालेल्या जवानांच्या नावाचा गौरावाने उल्लेख करण्यात येऊन शस्त्र सलामी देण्यात आली.
0000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...