Thursday, October 21, 2021

सुधारीत वृत्त

पोलीस स्मृती दिनानिमित्त मान्यवरांचे अभिवादन

नांदेड, (जिमाका) 21 :- कायदा व सुव्यवस्था, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व इतर राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतांना पोलीस खात्यातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून विरगती प्राप्त केली आहे. यावर्षी संपूर्ण भारतातून सुमारे 377 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना विरगती प्राप्त झाली. आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज शहीद पोलीसांना श्रद्धांजली अर्पण करून स्मृती स्तंभास अभिवादन केले. 

पोलीस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावर्षी शहीद झालेल्या जवानांच्या नावाचा गौरावाने उल्लेख करण्यात येऊन शस्त्र सलामी देण्यात आली.
0000




No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...