Thursday, August 2, 2018


स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिन

समारंभ नियोजनाची बैठक संपन्न

           नांदेड दि. 2 :-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिन बुधवार, 15 ऑगस्ट 2018 रोजी आहे. त्यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रामदास कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वा. होणार आहे. यासाठी नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि नीटनेटक्या पद्धतीने, सुनियोजितपणे साजरा व्हावा, यासाठीचे विविध निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बैठकीत दिले.

बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त लहूराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.

स्वातंत्र्य दिन वर्धापदिन निमित्त आयोजित समारंभास शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याबाबत संबंधित विभागांनी, कार्यालय प्रमुखांनी दक्ष रहावे व उपस्थितीबाबत सूचना द्याव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 मिनीटांनी होणार आहे. या समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहण किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला असा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास, त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्यापुर्वी किंवा 9.35 वाजेनंतर करावा. याबाबत विविध स्तरावरून माहिती देण्यात यावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

ध्वजारोहणाच्या समारंभाबाबत ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. विद्यार्थी व नागरिकांना ध्वजासाठी प्लॅास्टीकच्या वापरावर बंदी असल्याचे निदर्शनास आणुन द्यावे. प्लॅास्टीकचे ध्वज वापरले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान ही सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे ध्वजसंहितेतील प्रत्येक गोष्टीचे काटेकोर पालन व्हावे याची दक्षता घ्यावी. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या अनुषंगाने विविध विभाग प्रमुख आणि यंत्रणांना सोपवण्यात आलेल्या कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रभात फेऱ्या, देशभक्तीपर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम यांच्या नियोजनाबाबतही सुचना देण्यात आल्या.

000000

कृषि केंद्रात दर्शनी भागात माहिती लावण्याचे निर्देश 
गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत
सुचनांची अंमलबजावणी करावी 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे           

नांदेड, दि. 2 :- जिनिंग व्यवस्थापकांनी गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत सुनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच याविषयी माहिती पत्रके सर्व कृषि विक्री केंद्रा दर्शनी भागात लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
गुलाबी बोंड अळी निर्मूलन किटकनाशके हाताळणी घ्यावयाची काळजी याविषयी कार्यशाळा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे 1 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रुईकर, कापुस संशोधक केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ए. डी. पांडागळे, कापुस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग, कृषि किटकशास्त्र डॉ. एस. एम. तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले, गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत मागील वर्षी झालेले नुकसान यावर्षी होणार नाही यासाठी आवश्यक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. कृषि विद्यापिठाने शिफारस केलेली जी औषधी आहेत ती वापरावीत. बेकायदेशी औषधे विक्रेत्याकडे सापडल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.   
           
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील यांची टिम तयार करुन त्यांना प्रत्येक गावा प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांनी पीक बदल करावा. प्रचार प्रसिध्दी वर्षभर करावी. शेती हे शास्त्र असू शास्त्रीय ज्ञान घे करावी तसेच कृषि सेवा केंद्राचे देखील प्रशिक्षण, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र यांच्यामार्फत नियमित घ्यावे तरुण शेतकरी यांना देखील समाविष्ठ करावे, असे सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी गुलाबी बोंड अळीचे निर्मुलन करण्यासाठी प्रचाराबरोबर कामगंध सापळे माफक दरामध्ये जिनिंगच्या व्यवस्थापकांना देण्याचे आवाहन केले.              
याप्रसंगी कापुस पिकावरील बोंड अळी निर्मूलनाबाबत कापुस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी किटकनाशके हाताळताना घ्यावयाच्या काळजीबाबत तसेच विषबाधा झाल्यास काय उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली. फेरोमन ट्रॅप किटकनाशक सुरक्षा किटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सुरुवातीला गुलाबी बोंडअळी याचे नियंत्रण किटकनाशकाची सुरक्षित हाताळणी पोस्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
सर्व उपविभाग कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती तसेच सर्व कापुस जिनिंगचे व्यवस्थापक, बियाणे, किटकनाशक विक्रेते, वितरक बियाणे किटकनाशक कंपनीचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र माफदाचे सचिव बिपीन कासलीवाल, बियाणे खते किटकनाशके असोसिएशनचे सचिव दिवाकर वैद्य यांची उपस्थित होते.
सुत्रसंचलन नितिन देशपांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक यांनी केले. तर आभार जिल्हा कृषि अधिकारी श्री. शिरफुले यांनी मानले.
0000000


गुरुद्वारा बोर्ड मतदार नाव
नोंदणीसाठी मतदार मदत केंद्र स्थापन
नांदेड, दि. 2 :- गुरुद्वारा बोर्ड मतदार नाव नोंदणीसाठी नांदेड तहसिल कार्यालयातील मतदार नोंदणी कक्ष, गुरुद्वारा परिसरात रेल्वे आरक्षण विभाग गेट नं. 2 व तलाठी सज्जा वजिराबाद यांचे कार्यालयात अतिरिक्त मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शिख समाजातील संबंधीत मतदारांनी  18 ऑगस्ट 2018 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
नांदेड उत्तर- 86 व नांदेड दक्षिण- 87 या मतदार संघात मागील सन 2012 निवडणुकीसाठी 8 हजार 600 शिख समाज मतदारांनी नोंदणी नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब मंडळ निवडणुकीसाठी केली होती.
आगामी तीन सदस्यीय निवडणुकासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यात येणार असून ज्यांची विधानसभा मतदार संघाच्या 1 जुलै 2018 च्या यादीत नावे समाविष्ट असतील अशा शिख समाजातील मतदारांनी फॉर्म- 1 शनिवार 18 ऑगस्ट 2018 पर्यंत नाव नोंदणी करावी, असेही आवाहन तहसिलदार श्री. अंबेकर यांनी केले आहे.
000000


पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- माजी सैनिकाच्या पाल्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2018 असून जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
ज्या माजी सैनिकांचे पाल्यांनी बारावी परिक्षेत 60 टक्के गुण घेवून व्यावसायीक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे  जसे इंजीनिअरींग, एमबीबीएस,  बी.डी.एस. नर्सींग कोर्सेस, बी. फॉर्मसी, ॲग्रीकल्चर, अशा अनेक व्यवसायीक कोर्सेससाठी तसेच पदवी परिक्षेत 60 टक्के गुण घेवून पदव्यूत्तर व्यवसायिक कोर्सेससाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती लागू आहे. संबधीत माजी सैनिकांच्या मुलांना 24 हजार रुपये व मुलींना 27 हजार रुपये वार्षीक शिष्यवृत्ती कोर्स पुर्ण होईपर्यंत लागू आहे. केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या  www.ksb.gov.in  वेबसाईटवर विस्तृत माहिती व अर्ज कसा सादर करावा यांच्या सुचना दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना अडचण असल्यास दुरध्वनी 02462-245510 वर संपर्क करावा.  तसेच यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विस्तृत माहिती उपलब्ध करुन मिळेल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी कळविले आहे.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 8.49 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात गुरुवार 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 8.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 135.83 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 430.86 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 45.40 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.25 (494.34), मुदखेड- 8.33 (590.68), अर्धापूर- 7.33 (453.34), भोकर- 5.25 (584.00), उमरी- 1.67 (465.32), कंधार- 24.00 (439.83), लोहा- 9.83 (432.15), किनवट- 3.29 (409.99), माहूर- 1.00 (570.00), हदगाव- 2.71 (553.74), हिमायतनगर- निरंक (523.34), देगलूर- 8.17 (171.33), बिलोली- 16.80 (294.00), धर्माबाद- 9.00 (318.65), नायगाव- 11.20 (332.60), मुखेड- 27.00 (260.40). आज अखेर पावसाची सरासरी 430.86 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6893.71) मिलीमीटर आहे.  
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...