Thursday, August 2, 2018


पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- माजी सैनिकाच्या पाल्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2018 असून जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
ज्या माजी सैनिकांचे पाल्यांनी बारावी परिक्षेत 60 टक्के गुण घेवून व्यावसायीक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे  जसे इंजीनिअरींग, एमबीबीएस,  बी.डी.एस. नर्सींग कोर्सेस, बी. फॉर्मसी, ॲग्रीकल्चर, अशा अनेक व्यवसायीक कोर्सेससाठी तसेच पदवी परिक्षेत 60 टक्के गुण घेवून पदव्यूत्तर व्यवसायिक कोर्सेससाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती लागू आहे. संबधीत माजी सैनिकांच्या मुलांना 24 हजार रुपये व मुलींना 27 हजार रुपये वार्षीक शिष्यवृत्ती कोर्स पुर्ण होईपर्यंत लागू आहे. केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या  www.ksb.gov.in  वेबसाईटवर विस्तृत माहिती व अर्ज कसा सादर करावा यांच्या सुचना दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना अडचण असल्यास दुरध्वनी 02462-245510 वर संपर्क करावा.  तसेच यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विस्तृत माहिती उपलब्ध करुन मिळेल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...