Thursday, August 2, 2018


कृषि केंद्रात दर्शनी भागात माहिती लावण्याचे निर्देश 
गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत
सुचनांची अंमलबजावणी करावी 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे           

नांदेड, दि. 2 :- जिनिंग व्यवस्थापकांनी गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत सुनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच याविषयी माहिती पत्रके सर्व कृषि विक्री केंद्रा दर्शनी भागात लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
गुलाबी बोंड अळी निर्मूलन किटकनाशके हाताळणी घ्यावयाची काळजी याविषयी कार्यशाळा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे 1 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रुईकर, कापुस संशोधक केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ए. डी. पांडागळे, कापुस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग, कृषि किटकशास्त्र डॉ. एस. एम. तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले, गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत मागील वर्षी झालेले नुकसान यावर्षी होणार नाही यासाठी आवश्यक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. कृषि विद्यापिठाने शिफारस केलेली जी औषधी आहेत ती वापरावीत. बेकायदेशी औषधे विक्रेत्याकडे सापडल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.   
           
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील यांची टिम तयार करुन त्यांना प्रत्येक गावा प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शेतकऱ्यांनी पीक बदल करावा. प्रचार प्रसिध्दी वर्षभर करावी. शेती हे शास्त्र असू शास्त्रीय ज्ञान घे करावी तसेच कृषि सेवा केंद्राचे देखील प्रशिक्षण, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र यांच्यामार्फत नियमित घ्यावे तरुण शेतकरी यांना देखील समाविष्ठ करावे, असे सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी गुलाबी बोंड अळीचे निर्मुलन करण्यासाठी प्रचाराबरोबर कामगंध सापळे माफक दरामध्ये जिनिंगच्या व्यवस्थापकांना देण्याचे आवाहन केले.              
याप्रसंगी कापुस पिकावरील बोंड अळी निर्मूलनाबाबत कापुस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी किटकनाशके हाताळताना घ्यावयाच्या काळजीबाबत तसेच विषबाधा झाल्यास काय उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली. फेरोमन ट्रॅप किटकनाशक सुरक्षा किटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सुरुवातीला गुलाबी बोंडअळी याचे नियंत्रण किटकनाशकाची सुरक्षित हाताळणी पोस्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
सर्व उपविभाग कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती तसेच सर्व कापुस जिनिंगचे व्यवस्थापक, बियाणे, किटकनाशक विक्रेते, वितरक बियाणे किटकनाशक कंपनीचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र माफदाचे सचिव बिपीन कासलीवाल, बियाणे खते किटकनाशके असोसिएशनचे सचिव दिवाकर वैद्य यांची उपस्थित होते.
सुत्रसंचलन नितिन देशपांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक यांनी केले. तर आभार जिल्हा कृषि अधिकारी श्री. शिरफुले यांनी मानले.
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...