Thursday, October 31, 2024

वृत्त क्र. 1017

विधानसभा निवडणुकीत 21 अर्ज मागे

वृत्त क्र. 1016

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  

 

नांदेड, दि. 31 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यात 3 नोव्हेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 17 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात नोव्हेंबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 17 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 1015

सोयाबीनच्या आद्रतेचे प्रमाण तपासून

खरेदी केंद्रावर विक्रीला आणावे


नांदेड दि. 31 ऑक्टोबर : शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीकरीता आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आद्रतेचे प्रमाण हे 12 टक्के पेक्षा कमी असल्याची व एफएक्यू दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करावी. त्यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आद्रता तपासून ती 12 टक्के पेक्षा कमी असल्यास आपले सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणावे. जेणेकरून जास्त आद्रतेमुळे आपले सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत करण्यात आले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात मतदारसंघनिहाय विधानसभेसाठी वैध ठरलेले उमेदवार 

83-किनवट : गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी, जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भिमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा., डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी, स. इमरान अली- इंडीयन नॅशनल लीग, गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष, अर्जुन किशन आडे -अपक्ष, आडकिने संतोष माधव-अपक्ष, किशन दामा राठोड-अपक्ष, किसन विठ्ठलराव मिराशे-अपक्ष, जयवंता केसर पवार-अपक्ष, जाधव सचिन माधवराव (नाईक) -अपक्ष, जाधव सपना सचिन (नाईक) -अपक्ष, जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष, डॉ. दत्ता मारुती धनवे-अपक्ष, दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष, धरमसिंग दगडू राठोड-अपक्ष, धावारे राजेश नारायण-अपक्ष, ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष, बेबीताई प्रदीप जाधव-अपक्ष, यादव जाधव-अपक्ष, विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष, विश्वनाथ कदम पाटील-अपक्ष, शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष, सयद शफियोदीन स. करिमोदीन-अपक्ष, संदिप निखाते-अपक्ष, संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष, संध्या प्रफुल राठोड-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत.  

84-हदगाव : गणेश देवराव राऊत- बहुजन समाज पार्टी, माधवराव निवृत्तीराव पवार- इंडीयन नॅशनल काँग्रेस, संभाराव उर्फ बाबुराव गुणाजीराव कदम- शिवसेना, अनिल दिगांबर कदम- प्रहर जनशक्ती पक्ष, दिलीप आला राठोड- वंचित बहुजन आघाडी, बापुराव रामजी वाकोडे- राष्ट्रीय समाज पक्ष, माधव दादाराव देवसरकर-महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, विलास नारायण सावते- आझाद समाज पार्टी (कांशि राम), शेख जाकेर शेख महुमद चाऊस- रिपब्लिकन सेना, अजिज खान मन्सुर खान पठाण-अपक्ष, अन्वर खन नुरूद्दीन खान-अपक्ष, अब्दुल समद खान हाजी जलाल खान-अपक्ष, अभिजीत गोधाजीराव मुळे-अपक्ष, अभिजीत विठ्ठलराव देवसरकर-अपक्ष, अशोक पांडुरंग राठोड-अपक्ष, प्रा. डॉ. अश्विकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर (प्रा.के सागर) -अपक्ष, आनंद होनाजी तिरमीडे-अपक्ष, उत्तम रामा गायकवाड-अपक्ष, उद्धव दाजिबाराव देशमुख (सुर्यवंशी) -अपक्ष, ओंकार माधवराव हांडेवार-अपक्ष, करण उत्तमराव गायकवाड-अपक्ष, गजानन आनंदराव शिंदे-अपक्ष, गजानन बापुराव काळे-अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार-अपक्ष, गौतम सटवाजी डोणेराव-अपक्ष, गंगाधर रामराव सावते-अपक्ष, तुकाराम रामजी चव्हाण-अपक्ष, दत्तात्रय पांडुरंग अनंतवार-अपक्ष, दिगंबर रामराव सुर्यवंशी-अपक्ष, दिनेश विजय श्रीरामजवार-अपक्ष, दिनेश विनायक रावते-अपक्ष, दिलीप उकंडराव सोनाळे-अपक्ष, दिलिप ग्यानोबा धोपटे-अपक्ष, देविदास नागनाथ स्वामी-अपक्ष, निळकंठ मुकींद कल्याणकर-अपक्ष, पांडुरंग दावजी दुधाडे-अपक्ष, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर-अपक्ष, प्रमोद राजाराम वानखेडे-अपक्ष, बाबुराव मुनेश्वर-अपक्ष, बालाजी परसराम वाघमारे-अपक्ष, बालाजी भगवान पऊळ-अपक्ष, मनोज मुधकरराव कदम-अपक्ष, माधव मोतीराम पवार-अपक्ष, ॲड मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील-अपक्ष, मिर मसरत आली मिर नाझीम आली-अपक्ष, रमाकांत दत्तात्रय शिंदे-अपक्ष, रमेश माधवराव नरवाडे-अपक्ष, राजु कोंडबा राऊत-अपक्ष, राजु शेषेराव वानखेडे-अपक्ष, ॲड. रामदास शिवराम डवरे-अपक्ष, डॉ. रेखा दत्तात्रय चव्हाण-अपक्ष, लता माधवराव फाळके-अपक्ष, वानखेडे सुभाष बापुराव-अपक्ष, विजयकुमार सोपानराव भरणे-अपक्ष, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर-अपक्ष, वैशाली मारोतराव हुक्के पाटील-अपक्ष, शेख अहेमद शेख उमर-अपक्ष, श्रीनिवास वैजनाथ पोतदार-अपक्ष, सरोज नंदकिशोर देशमुख-अपक्ष, सुनिता माधव देवसरकर-अपक्ष, सुभाष मारोतराव जाधव-अपक्ष, ॲड संतोष उत्तमराव टिकोरे-अपक्ष, ज्ञानेश्वर कोंडबाराव गुद्धटवार-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत.

 

85-भोकर :  कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते- बहुजन समाज पार्टी, तिरुपती बाबूराव कदम- इंडियन नॅशनल काँग्रेस, श्रीजया अशोकरराव चव्हाण- भारतीय जनता पार्टी, साईप्रसाद सुर्यकांतराव जटालवार- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डॉ. अर्जुन कुमार सिताराम राठोड- जन जनवादी पार्टी, कौसर सुलताना- इंडियन नॅशनल लीग, गजानन दत्तरामजी धुमाळ- बुलंद भारत पार्टी, तिरुपती देविदास कदम- जनता दल रेक्युलर, दिनेश मुक्तीराम लोणे- रिपब्लिकन सेना, नागनाथ लक्ष्मन घिसेवाड- जनहित लोकशाही पार्टी, नामदेव नागोराव आयलवाड-प्रहार जनशक्ती पक्ष, मखसुद अ. रज्जाक शेख- ऑल इंडिया मजलीस-ए-इंकलाब-ए-मिल्लत, माधव तुकाराम सुर्यवंशी- राष्ट्रीय मराठा पार्टी, शिला प्रभु वाघमारे- बहुजन भारत पार्टी, साहेबराव बाबा गोरठकर- राष्ट्रीय समाज पक्ष, सुरेश टिकाराम राठोड- वंचित बहुजन आघाडी. अजयकुमार मधुकर हंकारे-अपक्ष, अजरोद्दीन वहीदोद्दीन इनामदार-अपक्ष, अतुल मुकूंदराव पाईकराव-अपक्ष, अमर खॉन सरदार अली खॉन-अपक्ष, अमिता अशोकराव चव्हाण-अपक्ष, अर्जुन दगडू गायकवाड-अपक्ष, अरविंद दिगांबर चव्हाण-अपक्ष, अलताफ अहेमद एकबाल अहेमद-अपक्ष, अलमास सहीदोद्दीन सय्यद-अपक्ष, अविनाश चंद्रप्रकाश सांगवीकर-अपक्ष, अशफाक अहमद-अपक्ष, अशफाक अहमद गुलाम हबीब-अपक्ष, अहमद शादूल शेख-अपक्ष, अशोक पांडुरंग राठोड-अपक्ष, अशोक माधवराव क्षीरसागर-अपक्ष, अक्षय भगवानराव सर्जे-अपक्ष, आदिल हुसैन आयनुल हुसैन-अपक्ष, आनंदा नागन नागलवाड-अपक्ष, आनंदा विश्वंभर जाधव-अपक्ष, अंजली ज्ञानेश्वर जाधव-अपक्ष, उत्तम बाबाराव खंदारे-अपक्ष, उषाताई आकाश भालेराव-अपक्ष, कदम रामकृष्ण गंगाराम-अपक्ष, करण उत्तमराव गायकवाड-अपक्ष, कल्पना विश्वनाथ बाबळे-अपक्ष, कार्तीक भुजंगा शेळके-अपक्ष, किशोर माधवराव राऊत-अपक्ष, कैलास कानिंदे-अपक्ष, कोमल विजय सिंगकर-अपक्ष, कोडदेव लक्ष्मणराव हाटकर-अपक्ष, कौसर अली जाहेद अली-अपक्ष, खान अलायार-अपक्ष, गजभारे साहेबराव भिवा-अपक्ष, गुणवंत गंगाधर सोळंके-अपक्ष, गौतम अर्जुन सावते-अपक्ष, चित्रकला नागोराव पोपुलवार-अपक्ष, ॲड चौहाण विजयसिंह नारायणसिंह-अपक्ष, चंद्रकांत विठ्ठल मुस्तापुरे-अपक्ष, चंद्रप्रकाश तुळशीराम सांगवीकर-अपक्ष, ॲड चांदपाशा पि.सरदार अली-अपक्ष, जमीर सालम अ. चाऊस-अपक्ष, जरीनाबेगम भ्र. अकबर अली खान-अपक्ष, जयश्री चंदन जोगदंड-अपक्ष, जाकीर सगीर शेख-अपक्ष, जितेंद्र जयवंत राठोड-अपक्ष, जुल्फेखान जिलानी सय्यद-अपक्ष, ज्योती मनोहर इंगोले-अपक्ष, तुकाराम गणपत बिराजदार-अपक्ष, दत्तात्रय पांडुरंग अनंतवार-अपक्ष, दशरथ बाबय्या स्वामी-अपक्ष, दिपक विश्वनाथ सरोदे-अपक्ष, देविदास नागनाथ स्वामी-अपक्ष, नवनाथ साहेबराव तिडके-अपक्ष, नंदा मारोती जाधव-अपक्ष, परीक्षति दत्तराम मुंगल-अपक्ष, प्रदीप पिराजी पाटील-अपक्ष, प्रभु दिगांबर कपाटे-अपक्ष, प्रमोद किशनराव कामठेकर-अपक्ष, प्रमोद पुरभाजी इंगोले-अपक्ष, प्रल्हाद रामजी इंगोले-अपक्ष, बालाजी परसराम वाघमारे-अपक्ष, बालाजी फकिरा बिरदे-अपक्ष, बालाजी कुलकर्णी-अपक्ष, बालाजी लक्ष्मण वाघमारे-अपक्ष, बालाजी शेषेराव कदम-अपक्ष, भगवान पि. भिमराव कदम-अपक्ष, भगवान माणिकराव जोधळे-अपक्ष, भिमराव संभाजी दुधारे-अपक्ष, म. अफसर म नवाज-अपक्ष, महानंदा नागोराव मोटेकर-अपक्ष, मैसाजी दत्तराम भांगे-अपक्ष, माधव नरसिंग मेकेवाड-अपक्ष, ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील-अपक्ष, मिर्झा असद बेग मेहरुन्नीसा बेगम-अपक्ष, मिना रमेश माने-अपक्ष, मिलींद केरबा नरवाडे-अपक्ष, मुक्ता सचिन नवघरे-अपक्ष, मो इलियास अब्दुल वहिद महोम्मद-अपक्ष, युनूसखा युसूफखा पठाण-अपक्ष, रज्जाक गफार अब्दुल-अपक्ष, रमा सखाराम पाटील-अपक्ष, रमाकांत दत्तात्रय शिंदे-अपक्ष, रमेश दौलाती माने-अपक्ष, रमेश निवृत्ती सुर्यवंशी-अपक्ष, रविकिरण रामराव शिंदे-अपक्ष, राजश्री बापुराव ताटे-अपक्ष, रामेश्वर संभाजी वाघाळे-अपक्ष, रुपाली साहेबराव सिरकंठवार-अपक्ष, लता गौतम कांबळे-अपक्ष, लता भगवानराव जोंधळे-अपक्ष, लक्ष्मिकांत गणपतराव कल्याणकर-अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड-अपक्ष, विजयमाला ज्ञानेश्वर कपाटे-अपक्ष, विलास दिगांबर शिंदे-अपक्ष, विश्वनाथ हिरामण बाबळे-अपक्ष, विश्वांभर गोपाळराव पवार-अपक्ष, वैशाली मारोतराव हुक्के पाटील-अपक्ष, शशिकांत संभाजी पाटील-अपक्ष, शितल राजेश चव्हाण-अपक्ष, शिवशंकर बालाजी बडवणे-अपक्ष, शिवाजी दत्तात्रय गायकवाड-अपक्ष, शिवाजी श्रीरंग हंबर्डे-अपक्ष, शेख अनवर शेख खादर-अपक्ष, शेख इरफान शेख रऊफ-अपक्ष, शेख फेरोज शेख नजीर-अपक्ष, शेख मुनीर शेख युसूफ-अपक्ष, शेख शब्बीर शेख हसन-अपक्ष, शंकर गणपती थोरात-अपक्ष, शंकर मारोतराव जाधव-अपक्ष, शाहरूख हाजी खमर-अपक्ष, सचिन उत्तमराव नवघरे-अपक्ष, सज्जाद खान अकबर खान-अपक्ष, सतीश बाबुराव इंगळे-अपक्ष, सतीश रामराव देशमुख-अपक्ष, सय्यद बिलाल-अपक्ष, सय्यद सिराज सय्यद शैकतअली-अपक्ष, सलीम अहमद अब्दुल कादर-अपक्ष, सागर मारोती जाधव-अपक्ष, सुर्यकांत माधवराव भोरगे-अपक्ष, संगीता तुकाराम कानोडे-अपक्ष, संजय शंकरराव घोरपडे-अपक्ष, संतोष प्रभु गव्हाणे-अपक्ष, संभाजी पि.रामजी काळे-अपक्ष, ज्ञानदिप दत्तात्रय भागानगरे-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत. 

86-नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अ गफुर- इंडियन नॅशनल कॉग्रेस, बालाजी देविदासराव कल्याणकर- शिवसेना, विठ्ठल किशनराव घोडके- बहुजन समाज पार्टी, सदाशिव व्यंकटकराव आरसुळे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संगीता विठ्ठल पाटील- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अकबर अख्तर खॉन- रिपब्लिकन पार्टी (इंडिया खोब्रागडे), अब्दुल नदीम खान- देश जनहित पार्टी, अहेमद रसुल शेख- भारतीय युवा जन एकता पार्टी, गजानन दत्तरामजी धुमाळ- बुलंद भारत पार्टी, प्रतिक सुनिल मोरे- रिपब्लिकन सेना, प्रदिप रामराव गुब्रे- संभाजी ब्रिगेड पार्टी, प्रभु मसाजी वाघमारे- बहुजन भारत पार्टी, प्रशांत विराज इंगोले- वंचित बहुजन आघाडी, मोहम्मद रियाज मोहम्मद अनवर- अ.भा.राष्ट्रीय रक्षा सेना, विजय विष्णु जाधव- राष्ट्रीय किसान कॉग्रेस पार्टी. अनिल नवनाथराव भालेराव-अपक्ष, अब्दुल रऊफ पि. अब्दुल वाहेद-अपक्ष, अमजद खान सखर खान-अपक्ष, अलीमोदिन मोहियोदिन काझी सय्यद-अपक्ष, अशोक संभाजीराव ढोले-अपक्ष, आनंदा कुंडलिकराव बोकारे-अपक्ष, इदरीस अहेमद-अपक्ष, इरफान फ्हरुक सईद-अपक्ष, गणेश मारोती तिडके-अपक्ष, चंद्रविकास व्यंकट वाघमारे-अपक्ष, ज्योति गणेश शिंदे-अपक्ष, तिरुपती आबाराव भगनुरे-अपक्ष, दिपक नरहरी राऊत-अपक्ष, नागोराव दिगंबर वाघमारे-अपक्ष, निलेश नरहरी इंगोले-अपक्ष, निसार शेख मकदुम-अपक्ष, परमेश्वर त्र्यंबकराव पाटील-अपक्ष, प्रदिपकुमार दत्तात्रय जैन-अपक्ष, फहाद सलीम शेख-अपक्ष, फेरोज खॉन जांगीरखान-अपक्ष, बालाजी जळबाजी भोसले-अपक्ष, बालाजी पुरभाजी सुर्यवंशी-अपक्ष, बालासाहेब दत्तराव देशमुख-अपक्ष, भास्कर निवृत्ती सोनसळे-अपक्ष, भिमराव विश्वनाथ बुक्तरे-अपक्ष, मधुकर रघुनाथ केंद्रे-अपक्ष, मधुकरराव किशनराव क्षिरसागर-अपक्ष, मनिष दत्तात्रय वडजे-अपक्ष, महमद तौफिक महमद युसूफ-अपक्ष, मिलिंद उत्तमराव देशमुख-अपक्ष, मो तोफिक शेख सांदलजी-अपक्ष, मोहम्मद मसीम-अपक्ष, युनुस खान-अपक्ष, रमेश नामदेव भालेराव-अपक्ष, रवि रमेशराव हाडसे-अपक्ष, राजेश्वर भाऊराव पावडे-अपक्ष, रामदास विठ्ठलराव शिंदे-अपक्ष, राहुल वामन चिखलीकर-अपक्ष, रेश्मा बेगम-अपक्ष, विजयकुमार तातेराव आढावे-अपक्ष, विठ्ठल माणीकराव शिंदे-अपक्ष, वैभव प्रकाश सोनटक्के-अपक्ष, वैशाली मिलींद देशमुख-अपक्ष, व्यंकट रामस्वामी मुदिराज-अपक्ष, शिवाजी गणपत भालेराव-अपक्ष, शेख अस्लम शेख इब्राहीम-अपक्ष, शेख लतीफ शेख बाबन-अपक्ष, शेजुळे जनार्धन गंगाधरराव-अपक्ष, श्याम शंकरराव जाधव-अपक्ष, सदाशिव राजाराम भुयारे-अपक्ष, सय्यद तनवीर सय्यद हमजा-अपक्ष, साहेबराव नागोराव गुंडीले-अपक्ष, सुर्यकांत नामदेवराव तादलापुरकर-अपक्ष, सोनाजी दत्ता वाघमारे-अपक्ष, संजना राजेश्वर हत्तीअंबीरे (पालमकर)-अपक्ष, संध्या बालाजी कल्याणकर-अपक्ष, संभाजी बालाजी भोसले-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत.  

87-नांदेड दक्षिण : आनंदा शंकर तिडके-शिवसेना, कविताबाई मोहनराव हंबर्डे- इंडियन नॅशनल कॉग्रेस, मोहनराव मारोतराव हंबर्डे- इंडियन नॅशनल कॉग्रेस, श्रीहरी गंगाराम कांबळे- बहुजन समाज पार्टी, अहेमर नदीम मोहम्मद इब्राहीम- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, एजाज अहमद अब्दुल कादर- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, खमर बिन बदर अलजाबरी-ऑल इंडीया मज्लीस ऐ इन्कीलाब ऐ मिल्लत, नय्यर जहा मोहम्मद फेरोज हुसैन- भारतीय युवा जन एकता पार्टी, नुरबी शेख गफुर- ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना, फारुक अहमद इकबाल अहमद- वंचित बहुजन आघाडी, सचिन गोविंदराव राठोड- जन जनवादी पार्टी, सय्यद मोईन- ऑल इंडिया मजलीस ए इतेहादुल मुस्लीमीन, संजय दिगांबर आलेवाड- राष्ट्रीय समाज पक्ष, अदित्य लक्ष्मीकांत देशमुख-अपक्ष, अमोल पांडुरंग गोडबोले-अपक्ष, अमृत उर्फ पप्पु अशोकराव पावडे-अपक्ष, इरफान फहरुक सईद-अपक्ष, कैलाश भागवतराव पुंड-अपक्ष, गौतम नरसिंगदास हिरावत-अपक्ष, जनार्धन गौतम सरपाते-अपक्ष, तिरुपती आबाराव भगनुरे-अपक्ष, दिलीप व्यंकटराव कंदकूर्ते-अपक्ष, निळकंठ पिराजीराव गव्हाणे-अपक्ष, फरजाना बेगम-अपक्ष, बालाजी मोतीराम  पुयड-अपक्ष, बाळासाहेब दगडुजी जाधव-अपक्ष, बेगम पाशाह शाहीन-अपक्ष, भारत बाबाराव कोपनर-अपक्ष, भास्कर बालाजी हंबर्डे-अपक्ष, महारुद्र केशव पोपलाईतकर-अपक्ष, माहम्मद तौफीक महमद युसु्फ-अपक्ष, मिलिंद दिनाजी शिराढोणकर-अपक्ष, मोहम्मद मुख्तार मोहम्मद मुनीर-अपक्ष, मोहम्मद मुज्जमील-अपक्ष, मोहम्मद वसीम मोहम्मद इकबाल-अपक्ष, मोहम्मद साबेर चाऊश-अपक्ष, यज्ञकांत मारोती कोल्हे-अपक्ष, रमेश दौलाती माने-अपक्ष, राजु रामदास उबाळे-अपक्ष, राजेश शांतीलाल वारकप-अपक्ष, लतीफखान पीरखान पठाण-अपक्ष, लक्ष्मण तुकाराम मोरे-अपक्ष, सचिन संभाजी पाटील उमरेकर-अपक्ष, सतिश  संभाजी पाटील उमेरकर-अपक्ष, सय्यद तनवीर सय्यद हमजा-अपक्ष, सय्यद युसुफ सय्यद पाशा-अपक्ष, सान्वी जगदीश जेठवाणी-अपक्ष, सुनिल साहेबराव मोरे-अपक्ष, सुभाष तुकाराम शिंदे-अपक्ष, सुरेश दिगंबर कांबळे-अपक्ष, संजय शिवाजीराव घोगरे-अपक्ष, संतोष माधव कुद्रे-अपक्ष  हे उमेदवार वैध ठरले आहेत. 

88-लोहा : एकनाथ रावसाहेब पवार- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चिखलीकर प्रतापराव गोविंदराव- नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, आशाबाई श्यामसुंदर शिंदे-पिझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया, चंद्रसेन ईश्वर पाटील-जनहित लोकशाही पार्टी, शिवकुमार नारायणराव नरंगले-वंचित बहुजन आघाडी, शंकरराव गणेशराव धोंडगे-महाराष्ट्र राज्य समिती, सुभाष भगवान कोल्हे-संभाजी ब्रिगेड पार्टी, आशा श्यामसुंदर शिंदे-अपक्ष, एकनाथ जयराम पवार-अपक्ष, गोदावरी विनायक लोहकरे-अपक्ष, पुरुषोत्तम केशवराव धोंडगे-अपक्ष, पंकज गोपाळराव वाखरडकर-अपक्ष, पंडीत सुदाम वाघमारे-अपक्ष, प्रकाश दिगंबर भगनुरे-अपक्ष, श्री प्रतापराव गोविंदराव पाटील-अपक्ष, बाबर रामेश्वर बालासाहेब (बालाजी)-अपक्ष, बालाजी रामप्रसाद चूकलवाड-अपक्ष, बालाजी सोपान हालगे-अपक्ष, भारत बाबाराव कोपनर-अपक्ष, मनिषा पुरुषोत्तम धोंडगे-अपक्ष, प्रा. मनोहर बाबाराव धोंडे-अपक्ष, मेहरबान मोतीराम जाधव-अपक्ष, मोहन गोविंदराव सिरसाट-अपक्ष, रंगनाथ रामराव भुजबळ-अपक्ष, विठ्ठल उत्तम जाधव-अपक्ष, विठ्ठल परसराम कदम-अपक्ष, श्यामसुंदर दगडोजी शिंदे-अपक्ष, सतीश संभाजी पाटील उमरेकर-अपक्ष, सुरेश दिगंबर कांबळे-अपक्ष, सुरेश प्रकाशराव मोरे-अपक्ष, सुरेश सुधाकर घोरबांड-अपक्ष, संजय चांदु भालेराव-अपक्ष, संभाजी गोविंद पवळे-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत.

89-नायगाव : पाटील मीनल निरंजन- इंडीयन नॅशनल कॉग्रेस, राजेश संभाजीराव पवार- भारतीय जनता पार्टी, अर्चना विठ्ठल पाटील- पिजन्स ॲण्ड वर्कस पार्टी ऑफ इंडीया, गजानन शंकरराव चव्हाण- प्रहर जनशक्ती पार्टी, डॉ. माधव संभाजीराव विभुते- वंचित बहुजन आघाडी, मारोती लचमन्ना देगलूरकर- लोकराज्य पार्टी, आकाशरेड्डी नरसारेड्डी सतपलवार- अपक्ष, कैलास श्रीनिवासराव देशमुख- अपक्ष, गंगाधर दिंगाबरराव कोतेवार-अपक्ष, गंगाधर नागोराव गायकवाड-अपक्ष, चंद्रकांत आनंदा फुगारे-अपक्ष, दत्ता यशवंता मोरे-अपक्ष, पुनम राजेश पवार-अपक्ष, प्रतिक्षा भगवानराव मनूरकर-अपक्ष, प्रभावती भगवानराव मनूरकर-अपक्ष, भगवान शंकरराव मनूरकर-अपक्ष, माधव गणपतराव वडजे-अपक्ष, माधवराव गंगाधर ताटे-अपक्ष, मुंकुदराव नागोजी बेलकर-अपक्ष, मोहम्मद रिजवान-अपक्ष, शिरीष श्रीनिवासराव देशमुख-अपक्ष, शिवराज भाऊराव पवार-अपक्ष, शिवाजी दामोदर पांचाळ-अपक्ष, शंकर पोशट्टी शामंते-अपक्ष, सुचिता सुरेशराव जोगदंड-अपक्ष, सौ. सुरेखा माधव विभुते-अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत. 

90-देगलूर : जितेश रावसाहेब अंतापूरकर-भारतीय जनता पार्टी, निवृत्ती कोंडीबा कांबळे-इंडियन नॅशनल कॉग्रेस, अनुराधा गंधारे-महाराष्ट्र विकास आघाडी, रविकांत जळबा गवळी-मराठवाडा मुक्ती मोर्चा, विरपक्ष शिवाचार्य महाराज-जन सुराज्य शक्ती, श्याम बाबुराव निलंगेकर-राष्ट्रीय समाज पक्ष, सुभाष पिराजीराव साबणे-प्रहर जनशक्ती पक्ष, सुशिलकुमार विठ्ठलराव देगलूरकर- वंचित बहुजन आघाडी, अंबादास लक्ष्मण भंडारे-अपक्ष, गायकवाड सुभाष लक्ष्मण- अपक्ष, डॉ. गंगाधर मरीबा सोनकांबळे- अपक्ष, चांदू हाणमंतराव सोनकांबळे दरेगावकर- अपक्ष, जया बाळू राजकुंडल- अपक्ष, दीपक चांदोबा कांबळे- अपक्ष, पुंडलीक मल्हारी देगावकर- अपक्ष, बाबुराव मरीबा कांबळे- अपक्ष, महादू गंगाराम गिरगावकर- अपक्ष, मोराती भारत सोनकांबळे- अपक्ष, मुकिंदर गंगाधर कुंडके- अपक्ष, मंगेश नारायण कदम- अपक्ष, यादव धोंडीबा सोनकांबळे- अपक्ष, राजाराम चांदोबा कांबळे- अपक्ष, रोहीत सुभाषराव साबणे- अपक्ष, विश्वंभर जळबा वरवंटकर- अपक्ष, शिवानंद रामराव धनवे- अपक्ष, सयाराम मरीबा निदाने- अपक्ष, सुभाष नागोराव अल्लापुरे- अपक्ष हे उमेदवार वैध ठरले आहेत.

91-मुखेड : पाटील हाणमंतराव व्यंकटराव, तुषार गोविंदराव राठोड, गोविंद दादाराव डूमणे, श्रीहरी राजाराम बुडगेमवार, बालाजी नामदेव खतगावकर, रुक्मीनबाई शंकरराव गीत्ते, परसराम दत्ता कदम, संतोष भगवान राठोड, रावसाहेब दिगांबरराव पाटील, प्रकाश चांदोबा गवलवाड, कल्पना संजय गायकवाड, शिवाजी नागोराव जाधव, राहूल राजू नावंदे, अहिल्याबाई हाणमंत मामीलवाड, देवानंद तुलजीराम देशमुख, विजयकुमार भगवानराव पेठकर, सतिश लक्ष्मणराव कावडे हे उमेदवार वैध ठरले आहेत.

00000

वृत्त क्र. 1014

निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ

 

नांदेड दि. 31 ऑक्टोबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिणचे प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुलकौठा,नांदेड येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्षप्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी  असे एकूण 2 हजार 684 जणांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. परंतु यापैकी मतदान केंद्राध्यक्ष 49, प्रथम मतदान अधिकारी 48 आणि इतर मतदान अधिकारी 104 असे एकूण 201 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते.

 

या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्यास चोवीस तासांचा अवधी दिला होता. आजपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष 24, प्रथम मतदान अधिकारी 32 आणि इतर मतदान अधिकारी 63 असे एकूण 119 जणांनी खुलासा सादर केला आहे. अजून  82 जणांनी खुलासा सादर केला नाही. अशा 82 जणांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  डॉ.  सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत.

00000

वृत्त क्र. 1013

दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदानाची शपथ आणि आवाहन

फोटो ओळी - 
नांदेड जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नागरी सांस्कृतिक समितीच्या वतीने बंदा घाट येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, व अनुराधा राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,सुनील नेरळकर,बापू दासरी, गजानन पिंपरखेडे, विजय जोशी, वसंत मैय्या, हर्षद शहा, सुरेश जोंधळे, आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी डॉ नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेल्या लक्षदीप हे कार्यक्रमात मुंबई येथील गायिका अनुजा वर्तक,सई जोशी, नितांशु सावंत आणि संचाने रसिकांना आपल्या सुश्राव्य गायनाने मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने नांदेडकर रसिक उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले व शपथ घेण्यात आली.
000000


















 वृत्त क्र. 1012

मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा 

: निरीक्षकांकडून आढावा


मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 31 ऑक्टोबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सुचवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करा.  हिवाळ्यातील छोटा दिवस बघता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक प्रकाश यंत्रणा असावीअसे आवाहन निवडणूक निरीक्षकांनी आज केले.

 

नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेल्या सामान्य ,खर्च आणि पोलीस निरीक्षकांची एकत्रित बैठक आज नांदेड विश्रामगृहामध्ये झाली. या बैठकीला श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे),शेलेंद्रकुमार (भाप्रसे),श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) रण विजय यादव (भाप्रसे) कालु राम रावत (भापोसे),मृणालकुमार दास (आयआरएस ) मयंक पांडे ( आयआरएस)ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमहानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप माळोदेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरनिवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार मानेयाशिवाय या निवडणुकीमध्ये जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रत्येक विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी निवडणुकी संदर्भात केलेल्या उपाययोजना व निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील केलेल्या तयारीचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रयापूर्वी दाखल झालेले गुन्हेआतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेली जानमालाची जप्तीकर्मचाऱ्यांची उपलब्धता मतदान व मतमोजणी केंद्रांची रचना व तयारी याबाबतचा एकूण आढावा सादर केला.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देखील यावेळी जिल्ह्यात आलेल्या अतिरिक्त पोलीस दलाच्या कुमकची माहिती दिली.तसेच बंदोबस्त व तैनाती संदर्भातील माहिती दिली.आंतरजिल्हा व आंतरराज्यीय सीमा लक्षात घेता. करण्यात आलेली नाकाबंदी व तपासणी पथकांच्या कार्याबाबत ही माहिती दिली.

 

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आदर्श आचारसंहितेच्या कडकपालना संदर्भात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर उमेदवारांकडून विविध स्तरावर एकदा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर होणाऱ्या खर्चाबाबत आयोगाच्या सूचनेनुसार कशा पद्धतीने निगराणी राखली जात आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क अधिकारी तसेच विविध विभागाच्या प्रमुखांकडून यावेळी आढावा सादर करण्यात आला.

 

निवडणूक निरीक्षकांनी यावेळी आपल्या काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मात्र मोठ्या संख्येने मतदान व्हावेयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच बंदोबस्तासाठी येणारे विविध दलातील पोलीस कर्मचारी त्यानंतर मतदान केंद्रावर येणारे दिव्यांग व्यक्ती हिवाळा असल्यामुळे प्रत्येक केंद्रावर सायंकाळची दिवाबत्तीची उपाययोजनाबहिष्कार असणाऱ्या गावांची समजूत घालणेव अन्य काही महत्त्वपूर्ण सूचना यावेळी निरीक्षकांनी केल्या. जिल्ह्यातील समस्त मतदारांना यावेळी निरीक्षकांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून मोठ्या संख्येने मतदान करण्याच्या आवाहनही केले आहे.

00000










  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...