Thursday, October 31, 2024

वृत्त क्र. 1014

निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ

 

नांदेड दि. 31 ऑक्टोबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिणचे प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुलकौठा,नांदेड येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्षप्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी  असे एकूण 2 हजार 684 जणांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. परंतु यापैकी मतदान केंद्राध्यक्ष 49, प्रथम मतदान अधिकारी 48 आणि इतर मतदान अधिकारी 104 असे एकूण 201 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते.

 

या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्यास चोवीस तासांचा अवधी दिला होता. आजपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष 24, प्रथम मतदान अधिकारी 32 आणि इतर मतदान अधिकारी 63 असे एकूण 119 जणांनी खुलासा सादर केला आहे. अजून  82 जणांनी खुलासा सादर केला नाही. अशा 82 जणांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  डॉ.  सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...