Thursday, October 31, 2024

 वृत्त क्र. 1012

मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा 

: निरीक्षकांकडून आढावा


मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 31 ऑक्टोबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सुचवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करा.  हिवाळ्यातील छोटा दिवस बघता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक प्रकाश यंत्रणा असावीअसे आवाहन निवडणूक निरीक्षकांनी आज केले.

 

नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेल्या सामान्य ,खर्च आणि पोलीस निरीक्षकांची एकत्रित बैठक आज नांदेड विश्रामगृहामध्ये झाली. या बैठकीला श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे),शेलेंद्रकुमार (भाप्रसे),श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) रण विजय यादव (भाप्रसे) कालु राम रावत (भापोसे),मृणालकुमार दास (आयआरएस ) मयंक पांडे ( आयआरएस)ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमहानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप माळोदेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरनिवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार मानेयाशिवाय या निवडणुकीमध्ये जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रत्येक विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी निवडणुकी संदर्भात केलेल्या उपाययोजना व निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील केलेल्या तयारीचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रयापूर्वी दाखल झालेले गुन्हेआतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेली जानमालाची जप्तीकर्मचाऱ्यांची उपलब्धता मतदान व मतमोजणी केंद्रांची रचना व तयारी याबाबतचा एकूण आढावा सादर केला.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देखील यावेळी जिल्ह्यात आलेल्या अतिरिक्त पोलीस दलाच्या कुमकची माहिती दिली.तसेच बंदोबस्त व तैनाती संदर्भातील माहिती दिली.आंतरजिल्हा व आंतरराज्यीय सीमा लक्षात घेता. करण्यात आलेली नाकाबंदी व तपासणी पथकांच्या कार्याबाबत ही माहिती दिली.

 

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आदर्श आचारसंहितेच्या कडकपालना संदर्भात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर उमेदवारांकडून विविध स्तरावर एकदा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर होणाऱ्या खर्चाबाबत आयोगाच्या सूचनेनुसार कशा पद्धतीने निगराणी राखली जात आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क अधिकारी तसेच विविध विभागाच्या प्रमुखांकडून यावेळी आढावा सादर करण्यात आला.

 

निवडणूक निरीक्षकांनी यावेळी आपल्या काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मात्र मोठ्या संख्येने मतदान व्हावेयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच बंदोबस्तासाठी येणारे विविध दलातील पोलीस कर्मचारी त्यानंतर मतदान केंद्रावर येणारे दिव्यांग व्यक्ती हिवाळा असल्यामुळे प्रत्येक केंद्रावर सायंकाळची दिवाबत्तीची उपाययोजनाबहिष्कार असणाऱ्या गावांची समजूत घालणेव अन्य काही महत्त्वपूर्ण सूचना यावेळी निरीक्षकांनी केल्या. जिल्ह्यातील समस्त मतदारांना यावेळी निरीक्षकांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून मोठ्या संख्येने मतदान करण्याच्या आवाहनही केले आहे.

00000










No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...