Thursday, October 31, 2024

दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदानाची शपथ आणि आवाहन

फोटो ओळी - 
नांदेड जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नागरी सांस्कृतिक समितीच्या वतीने बंदा घाट येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, व अनुराधा राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,सुनील नेरळकर,बापू दासरी, गजानन पिंपरखेडे, विजय जोशी, वसंत मैय्या, हर्षद शहा, सुरेश जोंधळे, आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी डॉ नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेल्या लक्षदीप हे कार्यक्रमात मुंबई येथील गायिका अनुजा वर्तक,सई जोशी, नितांशु सावंत आणि संचाने रसिकांना आपल्या सुश्राव्य गायनाने मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने नांदेडकर रसिक उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले व शपथ घेण्यात आली.
000000


















No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...