Saturday, May 8, 2021

 

प्रादेशिक परिवहन विभागाचे

100 टक्के महसुल उद्दीष्ट पूर्ण

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  कोव्हीड -19 च्या विपरीत परिस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2020-21 या आर्थिक वर्षात 100 टक्के महसुल उदिष्ट पूर्ण केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. आगामी काळातही परिवहन विभाग महसूल वृध्दीसाठी प्रयत्नशिल राहील असे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी कळविले आहे. 

नांदेड परिवहन विभागामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षात रु. 148.01 कोटी रकमेचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. नांदेड विभागास शासनाकडून देण्यात आलेल्या रु. 117 कोटी इतक्या लक्ष्यांकाच्या तूलनेत 126 टक्के लक्ष्यांक प्राप्त करण्यात आले आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात आकर्षक, पसंतीच्या वाहन वाटपातून सुमारे रु. 1.72 कोटी इतका महसूल जमा करण्यात आला. 

नांदेड परिवहन विभागाच्या अखत्यारित असलेल्या नांदेड, परभणी व हिंगोली या कार्यालयांच्या वायुवेग पथकांनी गेल्या आर्थिक वर्षात रु. 5.73 कोटी इतक्या रकमेचा दंड व थकीत कर वसूली केली आहे. वायुवेग पथकांना देण्यात आलेल्या रु. 5.76 कोटी इतक्या लक्ष्यांकाच्या तुलनेत 99.48 टक्के एवढे लक्ष्यांक पूर्तता केली  आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने

विषयी माहितीसाठी ऑनलाईन वेबिनार

नांदेड (जिमाका) दि. 8 :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत नांदेड जिल्हात योजनेविषयी आणि ऑनलाईन / ऑफलाईन अँप्लिकेशन संबंधी येणारे अडचणीवर मंगळवार 11 मे 2021 रोजी दुपारी 12 वा. वेबिनारचे आयोजन केले आहे. या योजनेची माहिती संबंधित संसाधन व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. 

Google Meet joining info Video call link:  https://meet.google.com/wuw-cqxw-vwa वेबिनार नोंदणीसाठी पुढील लिंकवर ऑनलाईन अर्ज भरावा. वेबिनार नोंदणी https://forms.gle/FLdyGiPsNnqnZmDZ7 येथे करुन जास्तीत जास्त नवीन युवा उद्योजकांनी किंवा जुन्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी या संधीचा लाभ घ्यावा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड आणि CHEMISIS LABORATORY & SHARDA TECHNO-COMMERCIAL ASSOCIATES LLP यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन / ऑफलाईन अँप्लिकेशन संबंधित अडचणीसाठी संसाधन व्यक्ती पवनकुमार काबरा 8055805500 अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड  02462-251674 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

 

1 हजार 43 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 497 व्यक्ती कोरोना बाधित

13 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 840 अहवालापैकी 497 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 419 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 624 एवढी झाली असून यातील 76 हजार 944 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 हजार 691 रुग्ण उपचार घेत असून 184 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 6 ते 8 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 696 एवढी झाली आहे. दिनांक 6 मे 2021 रोजी भगवती कोविड रुग्णालय येथे अर्धापूर येथील 85 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे बळीरामपूर नांदेड येथील 57 वर्षाचा पुरुष, दिनांक 7 मे रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट तालुक्यातील नांदगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 35 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, फोनिक्स कोविड रुग्णालय येथे विठानगर नांदेड येथील 83 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय येथे किनवट येथील 62 वर्षाचा पुरुष, हिंगोलीगेट नांदेड येथील 55 वर्षाची महिला, फलसिंग उमरी येथील 53 वर्षाची महिला तर दिनांक 8 मे रोजी भोकर येथील 70 वर्षाचा पुरुष व महिला, चैतन्यनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, वसरणी नांदेड येथील 45 वर्षाची महिलेचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 156, बिलोली तालुक्यात 11, हिमायतनगर 32, मुदखेड 4, बोधन 1, अकोला 1, नांदेड ग्रामीण 7, देगलूर 19, कंधार 21, मुखेड 34, परभणी 4, बिदर 1, अर्धापूर 11, धर्माबाद 20, किनवट 10, नायगाव 16, हिंगोली 9, माहूर 19, हदगाव 14, लोहा 22, उमरी 2, यवतमाळ 5 व्यक्ती बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 23, बिलोली 2, हिमायतनगर 1, मुदखेड 3, परभणी 2, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 5, कंधार 1, मुखेड 11, यवतमाळ 3, अर्धापूर 4, उमरी 1, किनवट 7, नायगाव 3, माहूर 6, हदगाव 2, लोहा 1, लातूर 1 असे एकूण 497 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 43 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 8, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 637, धर्माबाद तालुक्यातंर्गत 20, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 15, उमरी तालुक्यातंर्गत 5, भोकर कोविड केअर सेंटर 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 33, मुखेड कोविड रुग्णालय 20, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, किनवट कोविड रुग्णालय 2, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 54, बिलोली तालुक्यातंर्गत 39, खाजगी रुग्णालय 126, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, बारड कोविड केअर सेंटर 2, माहूर तालुक्यांतर्गत 33, हदगाव तालुक्यातर्गत 4, लोहा तालुक्यांतर्गत 13, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली . 

आज 5 हजार 691 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 114, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 72, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 74, देगलूर कोविड रुग्णालय 21, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, बिलोली कोविड केअर सेंटर 93, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 22, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 40, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 38, मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 36, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 16, एनआरआय कोविड केअर सेंटर 49, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 531, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 872, खाजगी रुग्णालय 1 हजार 314 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 60, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 82 हजार 117

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 87 हजार 460

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 624

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 76 हजार 944

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 696

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-64

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-381

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 691

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-184

00000

 

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...