Wednesday, April 19, 2017

आंबेडकर चौक ते धनेगाव चौक रस्ता
 20 मे पर्यंत वाहतुकीस बंद राहणार
नांदेड, दि. 20 :- राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या दरम्‍यानचा रस्‍ता बांधकाम करण्‍यासाठी शुक्रवार 21 एप्रिल 2017 सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 20 मे 2017 रात्री बारा वाजेपर्यत सर्व प्रकारच्‍या वाहनास बंद राहणार आहे. याकाळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
       या मार्गावरील रहदारीच्‍या विनियमनासाठी व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी कार्यकारी अभियंता, राष्‍ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांनी राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या रस्‍त्‍यांचे बांधकाम करण्‍यासाठी वाहनास प्रतिबंध करणे आवश्‍यक असल्‍याचे निर्दशनास आणून दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी  मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या दरम्‍यान रस्‍ता बांधकाम करताना वाहतूक सुरळीत रहावी, नागरीकांची गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो नये म्हणून शुक्रवार 21 एप्रिल 2017 सकाळी सहा वाजेपासून ते शनिवार 20 मे 2017 रात्री बारा वाजेपर्यत सर्व प्रकारच्‍या वाहनास बंद राहण्याचे अधिसूचित करण्यात येत आहे. या कालावधीत राष्‍ट्रीय महामार्ग क्र.361 वरील वाहतूक शिवाजी चौक (धनेगांव) चंदासिंग कॉर्नर ढवळे चौक दुध डेअरी चौक वसरणी आंबेडकर चौक या दुहेरी मार्गाने वाहतूक वळविण्‍यात येत आहे. या बदलाबाबत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्याचे आदेशित करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्‍लंघन केल्यास, तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...