समाज कल्याणच्या शिष्यवृत्तीबाबत
महाविद्यालयांना आवाहन
नांदेड, दि.
3 – जिल्हयातील अनुदानित, विनाअनुदानित, व्यवसायिक वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयानी
शैक्षणिक वर्ष 2015-16 मधील
अनुसूचित जाती , विजाभज, इमाव
व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची
ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी,
परिक्षा फी प्रलंबित अर्ज गुरुवार 15 डिसेंबर 2016 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिन आयडीवर फॉरवर्ड करावेत.
अर्ज फॉरवर्ड केल्यानंतर अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे (विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी ) समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन असे सहायक आयुक्त समाज कल्याण
नांदेड यांनी कळविले आहे.
शैक्षणिक वर्षे 2015-16 मधील 2 हजार 294 अर्ज
अद्याप महाविद्यालयाच्या क्लॉर्क लॉगिन आयडी व प्राचार्य लॉगिन आयडीवर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज सादर
न केल्यास किंवा उशिराने सादर
केल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज
ऑनलाईन प्रणालीमधून रिजेक्ट करण्यात येतील. विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान झाल्यास सर्वस्व जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहिल, असे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी
कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment