Saturday, August 18, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी
शेतकऱ्यांनी 9 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावीत  
नांदेड दि. 18 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून 9 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत लाभ ेण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर कराव, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत  सन 2018-19 या वर्षासाठी हे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.        या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी शेतकऱ्याने अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा. त्यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कोणत्याही एकाच पॅकेजची मागणी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छूक लाभार्थी   हा अनुसूचित जाती नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारा शेतकरी अनुसूचित जमातीचा असला पाहिजे. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाण पत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नावे जमीन धारणेचा 7/12 दाखला 8- चा उतारा असणे आवश्यक आहे. नविन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नावे किमान 0.40 हेक्टर नविन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.  या योजनेअंतर्गत लाभ घेणेसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर राहील. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे हे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार रुपया पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी बंधीत तहसीलदार यांचेकडून सन 2017-18 चे उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेणे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या ठरावाची प्रत जोडावी. प्रस्तावधारक अनु.जाती / नवबध्द शेतकऱ्यांने या पूर्वी विशेष घटक योजना / डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अनु.जमातीच्या शेतक-यान ओटीएसपी / टिएसपी योजने स्वत: किंवा कुटंबातील सदस्याने लाभ घेतलेला नसावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये)बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजनेअंतर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर - 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये. शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत)-500 रुपये. पंप संच- 20 हजार रुपये (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहिल. पीव्हीसी पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत )- 30 हजार रुपये (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार 100 टक्के / 600 मी. पाईप्सच्या मर्यादेत यापैकी किमान प्रमाणे अनुदान देय राहिल.) या घटकामधून नविन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज व शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज या तीन पॅकेज मधील एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...