Thursday, January 4, 2018

बेरोजगारांसाठी
बुधवारी भरती मेळावा
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने बुधवार 10 जानेवारी 2018 रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
या मेळाव्यात नामांकित कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सेल्स ऑफिसर, हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची संख्या अंदाजे 290 असून किमान शैक्षणीक पात्रता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. वेतन 4 ते 12 हजार रुपये राहील. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन एन्ट्री पास करुन घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 02462-251674 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...