होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव- 2020
17 ते 19 या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची मेजवाणी
नांदेड, दि. 16:- नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिकक वारसा लाभलेले व चालुक्यांची उपराजधानी म्हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्हणून होट्टलची ख्याती आहे. होट्टल येथे सिध्देश्वराचे प्राचीन चालुक्य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्प स्थापत्य कलेचा समृध्द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्यादृष्टीने आवश्यक आहे. त्यादृष्टिने होट्टल ता. देगलूर जि. नांदेड येथे दिनांक 17 जानेवारी, 2020 वेळ सांयकाळी 5-00 वाजता होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
लोकसभा सदस्य प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. अमरनाथ राजूकर, आ. राम पाटील रातोळीकर, मा. वि. स.स. यांच्या स्थानिक निधीतून सुभाष साबणे यांच्या स्थानिक विकास निधीतून होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे उद्घाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण , नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सदस्य प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभा सदस्य हेमंत पाटील, लातूर लोकसभा सदस्य सुधाकर श्रृंगारे याची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विधान परिषद सदस्य सतीष चव्हाण, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर, किनवट विधानसभा सदस्य भिमराव केराम, हदगाव विधानसभा सदस्य माधवराव पवार जवळगांवकर, लोहा विधानसभा सदस्य श्यामसुंदर शिंदे, नांदेड उत्तरचे विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर, माजी विधानसभा सदस्य सुभाष साबणे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधानसभा परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, देगलूर विधानसभा रावसाहेब अंतापूरकर, मुखेड विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड, नांदेड दक्षिणचे विधानसभा सदस्य मोहनराव हंबर्डे, नायगाव विधानसभा सदस्य राजेश पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, देगलूर पंचायत समितीचे सभापती संजय वल्कले, करडखेड जिल्हा परिषद सदस्य ॲङ रामराव नाईक पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया , प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश दिपक धोळकिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, वळग पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती मुक्ताबाई कांबळे आदि विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
होट्टलचे सरपंच शेषराव सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , लेखाधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक निळकंठ पाचंगे विनीत असणार आहेत.
दिनांक 17 जानेवारी, 2020 रोजी गायन व तबला वादन सहभाग ऐश्वर्या परदेशी व भार्गव देशमुख, होट्टल वेळ 4-30 ते 5-00, उद्घाटन मान्यवरांचे हस्ते सायंकाळी 5-00 ते 7-00, अमृतगाथा (कथ्थक नृत्य) सुप्रसिध्द सिनेतारका व नृत्यांगना शर्वरी जमेनिस व संच, पुणे सायकांळी 7-00 ते 10-00.
दिनांक 18 जानेवारी, 2020 कार्यक्रम चर्चासत्र चालुक्यन स्थापत्य कला डॉ.प्रभाकर देव,सुरेश जोंधळे, प्रा. चंद्रकांत पोतदार, डॉ. रंजन गर्गे दुपारी 12-00 ते 2-00, पखवाज वादन व बासरी वादन जुगलबंदी उध्दवबापू आपेगांवकर व ऐनोद्दिन वारसी व संच होट्टल सांयकाळी 6-00 ते 7-00, लोककला लावणी नृत्याविष्कार प्रख्यात नृत्यांगना ऐश्वर्या बडदे व संच, नवी मुंबई सांयकाळी 7-00 ते 10-00 .
दिनांक 19 जानेवारी, 2020 समारोप मान्यवरांच्या हस्ते सांयकाळी 5-00 ते 7-00, गीत रामायण सुप्रसिध्द गायक संजय जोशी व संच सांयकाळी 7-00 ते 8-00 , लोकसंगीत विजय जोशी व संच , सांयकाळी 8-00 ते 9-00, भारुड निरंजन भाकरे व संच औरंगाबाद सांयकाळी 9-00 ते 10-00 .
0000
No comments:
Post a Comment