Saturday, January 18, 2020








होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

होट्टलच्या पर्यटन विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार  
                                  --- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 18:- होट्टलच्या पर्यटन विकासासाठी सर्वोत्परीने प्रयत्न करणार असून यासाठी शासनामार्फत एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमास आमदार अंतापुरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, देगलूर पंचायत समितीचे सभापती संजय वल्कले, जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव नाईक, पंचायत समितीचे श्रीमती मुक्ताबाई कांबळे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे,जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले,अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, भोकरचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, लेखाधिकारी तथा होट्टल महोत्सवाचे समन्वय निळकंठ पाचंगे, होट्टल ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
होट्टल महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होट्टल, तालुका देगलूर येथे झाले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणे आवश्यक असून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
यावेळी उद्घाटनपर बोलताना ना.अशोकराव चव्हाण म्हणाले की, होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवामुळे सांस्कृतिक मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जोपासली पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणे आवश्यक असून त्यासाठी पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच देगलूर ते हाणेगावसह व जिल्ह्यातील रस्त्यांची कामे लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. होट्टल विकासासाठी रस्त्यांसह विविध पायाभूत निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील.  
नांदेड जिल्ह्यातील होट्टल ता. देगलूर येथी विदेशी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देवून होट्टल जागतिकस्तरावर नावारुपास येईल. मराठवाड्यातील शाळा, महाविद्यालयांना होट्टल काय आहे, याबाबत माहिती देवून त्यांना निमंत्रितही करावे. जेणे करुन होट्टल ता. देगलूरचा कायापालट होण्यासाठी वेळ लागणार नाही, असेही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
 प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी सांगितली. चालुक्यकालिन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले होट्टल हे पर्यटनस्थळ अधिक नावापरुपास यावे, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
होट्टल पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ दिपप्रज्वलनाने झाला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, तहसीलदार अरविंद बोळंगे, सरपंच शेषेराव सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या महोत्सवास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी-अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
होट्टल ता.देगलूर येथील होट्टल पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात
विविध कार्यक्रमांची मेजवानी
होट्टलच्या शिल्पकलेच्या पार्श्वभूमिवर होट्टल कार्यक्रम रंगमंचावर सुरुवात झाली. ऐश्वर्या परदेशी व भार्गव देशमुख यांच्या तबला वादनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सुप्रसिध्दी सिनेतारका व नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांचा संच , पुणे यांनी अमृतगाथा (कथ्थक नृत्य) यांनी रसिकांची मने जिंकली. मोठ्या संख्येने रसिकांनी सर्व कार्यक्रमांना दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला.
दिनांक 19 जानेवारी, 2020 समारोप मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर सांयकाळी 5-00 ते 7-00, गीत रामायण सुप्रसिध्द गायक संजय जोशी व संच सांयकाळी 7-00 ते 8-00 , लोकसंगीत विजय जोशी व संच , सांयकाळी 8-00 ते 9-00, भारुड निरंजन भाकरे व संच औरंगाबाद सांयकाळी 9-00 ते 10-00 असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...