Friday, January 18, 2019

तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेत यावर्षी बदल
- डॉ. वाघ
नांदेड, दि. 18:-  राज्यात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत वाढ होण्यासाठी पध्दतीत सुधारणा करुन 1 मे पासून नोंदणी सुरु होणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या अधिकारी वर्गास संबोधित करताना सांगितले. यावेळी सहसंचालक महेश शिवणकर उपस्थित होते. यावेळी श्री शिवणकर, संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वाघ म्हणाले, देशाच्या विकासात युवावर्गास आणण्याची जबाबदारी लक्षात घेवून तंत्रनिकेतनातून नव्या तंत्रज्ञानाला पूरक अभ्यासक्रम बदल करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण अंतर्भूत आहे. ग्रामीण, शहरी मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद पदविका अभ्यासक्रमात असून पदविका अभ्यासक्रमाची उपयुक्तता जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पदविका अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या विविध शाखांची प्रवेश नियमाबद्दल माहिती दयावी. त्यासाठी  सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. डॉ. वाघ यांनी संस्थेचा परिसर मध्यवर्ती असल्याने विकासाला मोठी संधी उपलब्ध असून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना त्यास पुरक शाखा सुरु कराव्यात, असेही सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासाविषयक सूचना दिल्या तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी प्राचार्य डॉ. गर्जे यांनी संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख यंत्र प्रा. आर. एम. सकळकळे यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...