Tuesday, November 10, 2020

                                                           पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी

नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यात 123 मतदान केंद्र

 

नांदेड (जिमाकादि. 10 :-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक मतदान प्रक्रीया जिल्ह्यात सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रनिहाय तयारी पूर्ण झाली आहे.  कोविड-19 अंतर्गत विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली.

 

जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ करता यावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल यासाठी 907 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.  या प्रक्रीयेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्राथमिक चाचणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर एक हजाराच्या आतच मतदार संख्या ठेवण्यात आली आहे.  प्रत्येकाची थर्मल चाचणी केली जाईल ज्यांचे तापमान अधिक असेल अशा मतदारांना त्याच बुथवर सुरक्षीत मतदानाची सुविधा असेल. ग्रामीण भागातील मतदारांसाठी सर्कलनिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्राची पाहणी निवडणूक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...