Wednesday, April 15, 2020


गुटखा, पानमसाला विक्री कार्यवाहीत
चार प्रकरणात 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड दि. 15 :- अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्वये गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा 7 लाख 70 हजार 740 रुपये व तीन वाहने किंमत 2 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स. वि. कनकावाड यांनी 4 एप्रिल 2020  रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकुण किंमत 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची रा. वाई बाजार यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी सु. द. जिंतुरकर यांनी 8 एप्रिल रोजी धर्माबाद मे. राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ 4 लाख 59 हजार 190 रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे 11 एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा व वाहन किंमत 2 लाख रुपयेचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच प्र.म. काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन 11 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत 9 हजार 750 रुपये व दुचाकी वाहन किंमत 35 हजार रुपये असा एकुण 44 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त (अन्न), म.रा. अन्न व औषध प्रशासन  तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरटया पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची  विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल, असे आवाहन, नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...