Friday, June 2, 2023

 महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अर्धापूर तालुक्यातील 

चार धाबाचालक व आठ मद्यपींवर कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका परिसरात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेडनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट-ब विभाग यांनी 29 मे 2023 रोजी रात्री केलेल्या कारवाईत 4 धाबाचालक / मालक व 8 मद्यपींवर कारवाई करण्यात आली.

 

अर्धापूर तालुक्यातील राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट, पिंपळगाव (शि)खालसा ढाबा, पिंपळगाव (शि) सुप्रीया धाबा चोरंबा फाटा विजय धाबा दाभड शिवारचे मालक गजानन पंढरीनाथ देशमुख, बळिराम प्रकाश क्षिरसागर, बदुकर राजाराम राठोड, मोहन संभाजी बोचरे हे आपल्या धाब्यामध्ये विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या धाब्यांवर दारुबंदी गुन्हे कामी छापा घातला असता चार धाबेचालक यांनी अवैधरित्या व कसलाही दारुचा परवाना नसताना विनापरवाना आपल्या मालकीच्या धाब्यांमध्ये प्रत्येकी 2 असे एकूण ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी दिल्याचे आढळून आल्याने याठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 , ब व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.

 

राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरट, पिंपळगाव (शि) ता. अर्धापूर येथील धाबा चालक गजानन पंढरीनाथ देशमुख व मद्यपिणारे ग्राहक  शिरीषकुमार संदरसिंग तेहरा रा. लेबर कॉलनी नांदेड, ळीराम बापुराव पटेवाडे रा. शिवरायनगर या आरोपींना नांदेड न्यायालयात हजर केले असता धाबाचालक / मालक यांना रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपीना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयेचा दंड ठोठावला.

 

खालसा ढाबा, पिंपळगाव (शि) ता.अर्धापूर येथील धाबाचालक बळिराम प्रकाश क्षिरसागर व इतर मद्य पिणारे ग्राहक गोविंदराव लिंबाजीराव चितेवार रा. वसंतनगर नांदेडव्यंकटेश विलास वेणीकर रा. हनुमानगड नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक / मालक यास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपये दंड ठोठावला.

 

सुप्रीया धाबा, चोरंबा फाटा ता. अर्धापुर येथील धाबा चालक बदुकर राजाराम राठोड, इतर मद्यपिणारे ग्राहक जनार्धन सुभाषराव लांडगे रा.चोरंबा ता. अर्धापुर आकाश गोरखनाथ राठोड रा.निमगाव ता.अर्धापुर या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालक यास रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 

विजय धाबा, दाभड शिवार येथील धाबाचालक मोहन संभाजी बोचरे व मद्यपिणारे ग्राहक  दिनेश मदन सुर्यवंशी रा.दाभड ता अर्धापूरशिवराज चंपतराव मदने रा-माळझरा ता.हदगाव जि.नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालकयास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2आरोपी इसमांना प्रत्येकी  500 रुपये असा एकूण रुपये 26 हजार रुपयोचा दंड ठोठावला.

 

वरील चारही कारवाईमध्ये धाबामालक आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे एकुण 1 लाख रुपये व 8 मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना प्रत्येकी 500 रुपये एकुण 4 हजार रुपये असे सर्व एकुण 1 लाख 4 हजार रुपये इतका दंड न्यायालयाने ठोठावला आहे.

 

ही कारवाई अधीक्षक अतुल अ. कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भरारी पथक नांदेडशहर निरीक्षक ए.एम.पठाण / राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. शेख, दुय्यम निरीक्षक किनवट-ब चे अनिल पिकलेशिवदास कुबडे, दुय्यम निरीक्षक बळिराम इथर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान आणि जवान-नि-वाहनचालक यांनी कार्यवाहीत पार पाडली.

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. चालक मालक यांनी अवैध हॉटेल/ धाबा/ क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाचवर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होवू शकते.

 

तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक / व्यक्तीने अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 5 हजार रुपये पर्यंत दंड होवू शकतो. कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकसह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अ.अ.कानडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...