Tuesday, September 10, 2024

 वृत्त क्र. 827

जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा

 

नांदेडदि. 10  सप्टेंबर : जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी शेतकरी आत्महत्या व तरुणांच्या आत्महत्या कशाप्रकारे थांबवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

 

सदर सप्ताहनिमित्त जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आशा यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त व मानसिक समस्याग्रस्त शेतकरीविद्यार्थी व नागरिक यांनी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ओपीडी क्रमांक 35 येथे मोफत समुपदेशन कक्ष कार्यान्वित असून यांचा रुग्णांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

यावेळी प्रशिक्षणार्थी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भारती कुंडल यांनी जिल्हा रुग्णालयतील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिनेएनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटीलनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाडमानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकरमेट्रन सुनिता राठोड तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल उदगीरकर यांनी केले तर प्रास्ताविक जयश्री गोरडवार यांनी केले व आभार प्रदर्शन मानसशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली मस्केअरुण वाघमारेबालाजी गायकवाडप्रकाश आहेरसुनिल तोटेवाडसुनिल खंडागळे व अर्चना भोसले यांनी परिश्रम घेतले.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...