वृत्त क्र. 678
पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची आज मुलाखत
नांदेड दि. 7 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठे,जलसंधारणाची कार्य, भूगर्भातील पाणी पातळी आदी विषयांवर एक विशेष मुलाखत उद्या आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सकाळी 8.40 वाजता प्रसारित होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची ही मुलाखत असून श्रोत्यांनी या मुलाखतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरात झालेल्या जलसंधारणाच्या कार्यामुळे, शेततळे, नाला खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची स्थिती यावर्षीचा पाऊस, पावसा संदर्भातील नियोजन, तसेच शेतकऱ्यांसाठी असणारा सल्ला व सामान्य नागरिकांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या संदर्भातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अभ्यासपूर्ण मुलाखत उद्या सकाळी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000
No comments:
Post a Comment