नांदेड जिल्ह्यात अकरा व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 257 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 व ॲटीजन तपासणीद्वारे 3 अहवाल असे एकूण 11 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 842 एवढी झाली असून यातील 1 लाख 129 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, कंधार 1, किनवट 1, यवतमाळ 1 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 15 असे एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 890
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 834
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 842
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 129
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment