Saturday, May 3, 2025

वृत्त क्रमांक 466

जिल्ह्यातील ५६ केंद्रावर २० हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

नांदेड, दि. ३ मे:- नीट 2025 ही परीक्षा 4 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये 56 परीक्षा केंद्रांवर घेतल्या जाणार आहे. या परीक्षेसाठी 56 केंद्र संचालक व 56 निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत, पर्यवेक्षणासाठी प्रत्येक कक्षामध्ये दोन पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे, एका परीक्षा कक्षामध्ये 24 विद्यार्थी असतील. नांदेड शहराच्या जवळपास 40 किलोमीटरच्या परीक्षेतील शाळा या परीक्षा केंद्र म्हणून घेण्यात आलेल्या आहेत. 

प्रश्नपत्रिका कस्टडी मधून घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेत पेटीचे सील तोडेपर्यंत त्यावर जीपीएस ने NTA मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्र वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी 11 पासून रिपोर्टिंग करावयाचे आहे. परीक्षेची वेळ दुपारी दोन ते पाच ही राहील. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट वर दिलेल्या सूचनेनुसार सोबत फोटो न्यायचे आहेत. इतर कोणतीही साहित्य परीक्षा केंद्रात नेता येणार नाही, पेन पेन्सिल सुद्धा तेथेच पुरवल्या जाईल, भारतातील सर्वात जास्त परीक्षार्थी असणाऱ्या जिल्ह्यांपैकी नांदेड जिल्हा एक आहे, जवळपास 20 हजार विद्यार्थी नांदेड जिल्ह्यामध्ये परीक्षा देणार आहेत. जिल्हाधिकारी मार्फत सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सदरील परीक्षेसाठी एक डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर व चार सिटी कॉर्डिनेटरची एनटीएमार्फत नेमणूक करण्यात आलेली आहे.

०००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 645     पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनां चे वितरण   नांदेड 20 जून - न...