विद्यार्थ्यांनी चित्र, निबंध व पत्राद्वारे केले पालकास मतदान करण्याचे आवाहन
नांदेड,दि. 11:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता स्वीप कक्ष 087 दक्षिण नांदेडमधील सर्व शाळांमध्ये मतदान जागृती याविषयी इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी चित्रकला स्पर्धा व इयत्ता पाचवी ते आठवीसाठी निबंध स्पर्धा आणि पत्रलेखन स्पर्धा दि. 1 ऑक्टोबर, 2019 रोजी घेण्यात आल्या .
विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संदर्भात सुंदर चित्रे काढून रंगविली तसेच पत्रातून पालक व सर्व नातेवाईक यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाजी विद्यालय सिडको 195 विद्यार्थी, होलीसिटी पब्लिक स्कूल 110 विद्यार्थी, नरसिंह विद्यामंदिर 130 विद्यार्थी , जिल्हा परिषद हायस्कूल कासरखेडा 175 विद्यार्थी, जिल्हा परिषद हायस्कूल 210 विद्यार्थी व जिल्हा परिषद हायस्कूल 195 विद्यार्थी यांनी चित्रकला, निबंध व पत्रलेखन कार्यक्रमात भाग घेतला. यात सहभागी विद्यार्थ्यांना मोंमेटम व प्रमाणपत्र देण्याचा तहसीलदार यांचा मानस आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून मतदान जागृतीच्या या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी यांच्या कल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
स्वीप टिम प्रमुख नयना पवार, आचमे सारिका, कर्वेडकर कौशल्या , येरेकर वंदना, मुसमे राजकुमार , हाके पंकज , अनिल बसवदे यांनी उपस्थित राहून या स्पर्धा ठिकांणाना भेटी दिल्या व सहकार्य केले.
0000
No comments:
Post a Comment