सहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक
स्कुलच्या
नवीन इमारत संकुलाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 15 :- किनवट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकलव्य
रेसिडेंसियल पब्लीक स्कुल सहस्त्रकुंड येथील नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते शनिवार 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळ
जिल्ह्यातील पांढरकवडा येथून होणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सहस्त्रकुंड
येथे ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित
राहणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किनवटचे प्रकल्प
अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
या इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले आहे. या बांधकामास 24 महिण्याचा
कालावधी देण्यात आला होता. या इमारतीसाठी 15 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली
आहे. इमारतीचे बांधकाम 10 हजार 862 चौ.मी. इतके करण्यात आले आहे. शाळा इमारत
बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह,
प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यंगतासाठी शौचालय,
विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के
रस्ते, संरक्षक भिंत, ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राउट टाकी 1.5 लक्ष लिटर. या
शाळा बांधकामासाठी 15 एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जमिनीवर 24 कोटी 16
लाख रुपये बांधकाम अंदाज पत्रकास मंजुरात प्राप्त असून इमारत संकुल बांधकाम पुर्ण
झालेले आहे.
एकलव्य रेसिडेसिंयल पब्लीक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या
शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश
क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील
एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळामध्ये विद्यार्थ्यांना
पात्रता परिक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी
जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment