Monday, October 7, 2019


दिव्‍यांग मतदाराच्‍या जागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन
नांदेड दि. 7 :- महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 अंतर्गत 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघात दिव्‍यांग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्‍यासंदर्भात निवडणुक आयोगाने दिव्‍यांग मतदार जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
देशातील प्रत्‍येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्‍यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्‍येक दिव्‍यांग मतदारांमध्‍ये वाढली पाहीजे या दृष्‍टीने निवडणूक विभाग प्रयत्‍नशील आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन 'माझं मत माझा स्‍वाभिमान' या पथनाट्याचे सादरीकरण 9 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड व जिल्‍हा प्राथमीक शाळा डेरला येथे दुपारी 12 या ठिकाणी आयोजन करण्‍यात आले आहे.
या पथनाट्यातुन दिव्‍यांग मतदारांना मतदाना दिवशी पुरविण्‍यात येणा-या सुविधा जसे मतदान केंद्रापर्यत स्‍वतंत्र वाहतुक व्‍यवस्‍था, व्‍हील चेअर, रॅम्‍प, मदतनीस, पीण्‍याचे पाणी, ब्रेल लिपीतील व चिन्‍हांकीत मतपत्रीका तसेच इतर सुविधा याबाबत माहिती उपस्थितांना देण्‍यात येणार आहे. तसेच मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी यांनी दिव्‍यांग मतदारांना कशा प्रकारे सहाय्य करावे याबाबत सुद्धा पथनाटयातुन माहिती देण्‍यात येणार आहे.
 या पथनाट्याचे सादरीकरण नारायणराव चव्‍हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज मंत्री, मारुती कदम, केदार जोशी, चैतन्‍य अर्जुने, ऋषीकेश यादव व कृष्‍णाकांत अमंगे हे करणार आहेत. या पथनाट्याचे  लेखन पीपल्‍स कॉलेजचे उपप्राचार्य डॅा.अशेाक सिद्धेवाड यांनी तर दिग्‍दर्शक नारायणराव चव्‍हाण विधी महाविद्यालयाचे प्रा.डॅा.महेश पाटील कारलेकर यांनी केले.
या पथनाट्याचे सादरीकरणाच्‍या प्रसंगी अधिकाधीक मतदारांनी सहभाग घ्‍यावा असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण ज-हाड, नायब तहसीलदार सौ.उर्मीला कुलकर्णी व पीडब्‍लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा. डॅा.. सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...