पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणीसाठी
6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ
नांदेड, (जिमाका), दि.
28 :- जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2020-21 साठी ऑनलाईन पीक कर्ज
नोंदणी शनिवार 6 जून 2020
पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर पीक
कर्ज मागणीची नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी घोषीत करण्यात
आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षीत व्हाव्यात
यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक
कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी
https://docs.google.com/forms/ d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_ LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7 He0g/viewform?usp=sf_link
या संकेतस्थळावर
ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27
मे 2020 दरम्यान करण्याबाबत मुदत दिली होती. या
कालावधी दरम्यान नांदेड
जिल्ह्यात 1 लाख 70 हजार 240
शेतकऱ्यांनी
ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी
नोंदविली आहे. पीक कर्ज मागणी नोंदणी याद्या व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँक शाखेस
पाठविण्यात आल्या आहेत.
खरीप पीक कर्ज हंगामात
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पीक
कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार 6 जून 2020
पर्यंत
मुदतवाढ दिली आहे, असेही
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment