Wednesday, December 23, 2020

 

कोविड-19 परिस्थितीमुळे

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विविध प्रदर्शन, कार्यक्रमाचे आयोजन रद्द 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. या निर्गमीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. याची शेतकरी, पशुपालक, भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले आहे. 

 जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. येथून 4 दिवस माळेगाव यात्रा महोत्सव भरविला जातो परंतु सध्या कोविड-19, शासन अधिसूचना 21 सप्टेंबर 2020 नुसार व जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी यात्रेत भरविण्यात येणारे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...