Wednesday, December 23, 2020

 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमिवर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार एका आदेशाद्वारे लागू केली आहे. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश 31 ऑक्टोंबर 2020 व 4,15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू राहणार आहेत. 

या आदेशाची अंमलबजावणी करणारे सर्व अधिकारी यांनी आदेशातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई  करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतून केलेल्या कृत्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...