Monday, January 27, 2020


राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संपन्न
नांदेड, दि. 27 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत विभागामध्ये राज्यस्तरीय टेक्नीकल प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली असून यात जवळपास 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरणचे कार्यकारी अभियंता बी. बी. पहूरकर, प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे, उपप्राचार्य पी. डी. पोपळे, विद्युत विभाग प्रमुख व्ही. व्ही. सर्वज्ञ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे आयोजक एस. टी. कांबळे, पी. एस. लिंगे, एस. जी. कदम, पी. के. विनकरे, ए. ए. सायर, जी. एम. बरबडे, वाय. के. ढाळे, बी. आर. कासारपठेकर, जी. आर. मिरासे, एस. एम. झडते, आर. एस. मध्यैबलवाड यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे प्रबंधक आर. एम. दुलेवाड, कार्यालयीन अधिक्षक जी. के. जमदाडे, विभाग प्रमुख डी. एम. लोकमनवार, आर. एम. सकहळकळे, बी. व्ही. यादव, डॉ. एस. एस. चौधरी, एस. एम. कंधारे, एस. पी. कुलकर्णी, एस. आर. मुधोळकर, एस. एन. ढोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्यांनी विद्युत विभागाचे कौतुक केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...