शासकीय तंत्रनिकेतन येथे
राज्यस्तरीय बुध्दीबळ, कॅरम स्पर्धा संपन्न
नांदेड, दि. 27 :- शासकीय
तंत्रनिकेतन नांदेड येथे दिनांक
22 व 23 जानेवारी
2020 दरम्यान IEDSSA अंतर्गत राज्यस्तरीय बुध्दीबळ
व कॅरम स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन अविनाश
धोंडगे, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम
मंडळ नांदेड यांच्या हस्ते
पार पडले.
उद्घाटक श्री. धोंडगे यांनी खेळाडूंना
प्रोत्साहानपर मार्गदर्शन केले. हरणे
किंवा जिंकणे हा खेळाचा
भाग असून सहभाग हा महत्वाचा
टप्पा आहे असे नमुद
केले. तसेच झेप ही गरुडाप्रमाणे
असावी आणि प्रयत्न हे मुंगी
सारखे असावेत असे मत त्यांनी
व्यक्त केले. श्री. धोंडगे
साहेबांनी त्यांच्या आत्मकथनातून स्पर्धा
परीक्षेची तयारी व संधी
याबाबी स्पर्धकांना प्रोत्साहीत
करुन गेल्या. या कार्यक्रमास
अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य
डॉ. जी. व्ही. गर्जे
यांनी भूषविले. कॅरम व बुध्दीबळ
खेळण्यासाठी एकाग्रता व संयमाची
आवश्यकता असते. या खेळामुळे
विकसीत झालेले गुण
विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी
उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन
त्यांनी केले.
प्रास्ताविक डी. एम. लोकमनवार, जीमखाना
उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख
उपयोजित यंत्रशास्त्र यांनी
केले व सर्व संघ
व व्यवस्थापकास शुभेच्छा दिल्या. या स्पर्धे
दरम्यान बुध्दीबळ स्पर्धेकरिता शासकीय
तंत्रनिकेतन पुणे ही संस्थातर
कॅरम करिता ए.आय.ए.आर. काळसेकर
पनवेल हे संघ विजय
ठरले तर शा.तं.जळगाव व राजेंद्र
माने तंत्रनिकेतन, आंबव जिल्हा
रत्नागिरी हे उपविजेतेदाचे मानकरी
ठरले.
या
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता जीमखाना
विभाग ए. बी.
दमकोंडवार, एस.एम. कंधारे, डॉ.
जी. एम. डक, डॉ. डी.
जी. कोल्हटकर, आर. व्ही.
आदमवाड, श्रीमती. एस. जी. दुटाळ, श्रीमती.
ए.ए. सायर तसेच उपप्राचार्य
पी. डी. पोपळे यांनी
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा
दिल्या तर सूत्रसंचालन श्रीमती
आर. के. देवशी व ए. बी.
दमकोंडवार यांनी कार्यक्रम यशस्वीते
बद्दल सर्वांचे आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment