Sunday, January 16, 2022

 

शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित

प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्यात मूल्याची वृद्धी होणार नाही. हे लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषि विभागाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत भोकर तालुक्यातील भोसी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या हळद, मसाले प्रक्रिया उद्योगास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गीते, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतून लाभ देण्याचे निश्चित केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत साधारणत: 1 कोटी रुपयाच्या प्रकल्पासाठी 60 टक्के जास्तीत जास्त 60 लाख रूपयापर्यंतचे अनुदान देय राहणार आहे.

 

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत  बारड येथील  शेतकरी नवनाथ देशमुख यांनी लाभ घेतलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते रोपवाटीकेचे उद्घाटन करण्यात आले. या रोपवाटिकेत विविध प्रकारच्या मिरची, वांगी, टोमॅटो, टरबुज, खरबुज आदी फलोत्पादन पिकांची रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 75 भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. एका रोपवाटीकेस 2 लाख 30 हजार अनुदान देण्यात येणार आहे.  बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भेट देऊन स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत थेट विक्री केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...