Saturday, January 15, 2022

 राष्‍ट्रीय मतदार दिनानिमीत्‍त विविध स्‍पर्धांचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्‍हा प्रशासनाकडुन राष्‍ट्रीय मतदार दिनाच्‍या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेत जिल्‍हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिकांनी व नवमतदारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 या महामारीच्‍या संदर्भात केंद्र व राज्‍य सरकारकडुन निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन यावर्षीचा राष्‍ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्‍यात येणार आहे.

 

यामध्‍ये इयत्ता नववी ते बारावी व पदवी, पदव्युत्तर वयोगटातील तसेच सर्व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी / महिला/ नागरिकासाठी लोकशाही आकाशकंदील बनविणे व भित्तीपत्रक तयार करणे इ. स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारे स्‍पर्धकांनी (विद्यार्थी) आकाशकंदील/ भित्तीपत्रक तयार करून 19 जानेवारी पर्यंत आपले शाळा महाविद्यालयात अथवा तालुक्‍यातील संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. खुल्या गटातील स्पर्धक महिला / नागरिक यांनीही तयार केलेले आकाशकंदील / भित्‍तीपत्रक इ. संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. उक्‍त प्राप्‍त विजेत्‍यामधुन तालुकास्‍तरावर प्रत्‍येक गटातून प्रथम/व्दितीय विजेते निवड करण्‍यात येतील.

 

स्‍पर्धेचे निकष / नियम :

लोकशाही आकाश कंदील

Ø  लोकशाही आकाश कंदीलावर निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार नोंदणी /जागृती इ.  बाबत संदेश/घेाषवाक्‍य / लोगो/चित्र असणे बंधनकारक राहील..

Ø  स्‍पर्धक लोकशाही आकाश कंदील त्‍यांना हवा त्‍या आकाराचा बनवू शकतील, आकाराचे बंधन राहणार नाही.

Ø  यासाठी लागणारे साहित्‍य  – आकाश कंदील तयार करण्‍यासाठी पर्यावरणपूरक साहित्‍याचा वापर केला जावा. डिझायनिंग करण्‍यासाठीचे रंग/रंगीत पेपर/जिलेटिन पेपर/तसेच इतर साहित्‍य स्‍पर्धकांनी स्‍वत: आणून घरी लोकशाही आकाश कंदील तयार करावायाचा आहे.

भित्‍तीपत्रक -

Ø  भित्‍तीपत्रकाचा आकार Regular Drawing Sheet  (Emperor size)  च्‍या आकाराचा असावा.

Ø  भित्‍तीपत्रावर  चित्रे /लिखीत मजकूर लिहीता अथवा चिकटवता येईल./ परंतु निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार जागृती इ.  बाबत संदेश/घेाषवाक्‍य असणे बंधनकारक राहील.

Ø  भित्तीपत्रकावर निवडणूक विषयक – लोकशाही, मतदार नोंदणी व मताधिकार  याबाबतचे लोगो/चित्र ही काढता येईल.

 

तसेच गाणी लोकशाहीची मतदान अधिकाराची ही संकल्पना घेऊन एक नवीन गीतरचना तयार करुन त्याचे जास्तीत जास्त चार मिनिटांचा व्हीडिओ बनवून (संगीत, नृत्य नेपथ्यासह) टेलीग्राम 9284453899 वर दिनांक 23 जानेवारी पर्यंत पाठवायचे आहेत.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...