Friday, June 16, 2017

मिटकॉनकडून बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण   
नांदेड दि. 16 - मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योजकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती व सर्वसाधारण घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रेडीमेड, गारमेंट, ब्युटी पार्लर, दुग्ध व्यवसाय, मोटार रिवायडींग, घरगुती उपकरण दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, फॅशन डिझाईनिंग इतर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणास प्रवेशासाठी किमान सातवी उत्तीर्ण, वय 18 ते 45 वर्षे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना अपंग महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, संसदग्राम, आदर्शग्राम, भुमीहीन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.  
इच्छुक युवक-युवतीनी सर्व कागदपत्रे मिटकॉन कार्यालयात सादर करावे. अधिक माहिती व प्रवेशासाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन मिटकॉनचे जिल्हा समन्वयक आर. एस. दस्तापुरे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...