नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी शुभारंभ
माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान
नांदेड दि. 29 जुलै : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना नियुक्तीपत्र देऊन या प्रशिक्षण योजनेची प्रतिनिधिक स्वरूपात सुरुवात जिल्ह्यात आज करण्यात आली.
कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा यादृष्टीने ही ६ महिन्यांच्या नियुक्तीची योजना आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे घडविता येणार आहे.
आज दुपारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे पहिले कार्यादेश प्रदान करण्यात आले.सुप्रसाद सूर्यकांतराव दामेकर, देगलूर, अंजली राजेंद्र आवतिरक, पाथरड रेल्वे, ता. मुदखेड, विश्वजीत रंजू खानसोळे, ओमकेश्वर संतोष कुमार उपलवाड असे कार्यादेश दिलेल्या या चार उमेदवारांचे नाव आहे. यापैकी सुप्रसादला तहसील कार्यालय देगलूर तर अन्य तीन उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी कामकाज सोपविण्यात आले आहे.
या प्रतिनिधीक व छोटेखाली कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती
ही कार्य प्रशिक्षण योजना 6 महिन्यासाठी असून रितसर नोंदणी करुन रुजू झालेल्या बारावी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय/पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदविधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल. बारावी, आय. टी. आय. पदविका, पदवीधर व पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जावून आपल्या लॉगिन आयडी पासवर्ड च्या माध्यमातून पोर्टलवर CMYKPY अंतर्गत नोंदविलेल्या विविध रिक्तपदांना ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment