Tuesday, June 18, 2019

कृषि विभागाचा लोगो सुधारीत करण्यासाठी आवाहन



नांदेड दि. 18 :- कृषि विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येतो. सध्या कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे.
या लोगोमध्ये सुधारणा करुन डीटीपी, डिझाईनची सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषि माहिती विभाग, कृषि भवन 2 रा मजला, शिवाजीनगर पुणे-5 येथे समक्ष व ddinfor@gmail.com, या ईमेलद्वारे मंगळवार 25 जून 2019 पर्यंत पाठविण्यात यावा.
उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, फर्म्स यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी. अधिक संपर्कासाठी रामकृष्ण जगताप, कृषि उपसंचालक (माहिती) कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे-5 कार्यालय नं. 020-25537865 मो.नंबर 9823356835 वर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...