Tuesday, June 18, 2019

माजी सैनिकांच्या प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बैठकीचे आयोजन



नांदेड दि. 18 :- माजी सैनिक / विधवा यांच्या अडचणी, पेन्शन तक्रारी,  इतर कार्यालयातील प्रलंबीत प्रकरणाबाबत माहिती घेऊन स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद यांचेकडून मेजर जे. बी. सिंग यांच्या उपस्थितीत निपटरा करण्यात येणार आहे. याबाबत माजी सैनिकांचा मेळावा / बैठकीचे आयोजन गुरुवार 20 जून 2019 रोजी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी 11 वा. करण्यात आले आहे.
हेडक्वार्टर औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडून नियुक्त मेजर जे. बी. सिंग हे गुरुवार 20 जून 2019 रोजी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे भेट देत आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी / विधवांनी त्यांची प्रलंबित असलेल्या प्रकरणांची एक प्रत सोबत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार 20 जून रोजी सकाळी 11 वा. उपस्थित राहून मेजर जे. बी. सिंग यांच्यासोबत चर्चा करावी. या बैठकीत शैक्षणिक सवलत / विद्यावेतन, पाल्यांचे प्रवेश प्रमाणपत्र व केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडील एज्युकेशन ग्राण्ट व इतर सुविधाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विरनारी यांच्या जमीन वितरणाचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. सर्व विरनारी / विरपिता / विरमाता व माजी सैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...