Wednesday, August 12, 2020

 

दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवासंस्थांना

राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि.12:- जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वंयसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2020 च्या अर्ज मागविले आहेत. हे अर्ज दिनांक 9 सप्टेंबर, 2020 च्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्घ आहे.

आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या पत्रान्वये या पुरस्कारासाठी पात्र असलेले व्यक्ती व स्वंयसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबत सुचित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व सदर पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्ती व स्वंयसेवी संस्था यांनी आपले परिपूर्ण असलेले अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या कार्यालयात 22 ऑगस्ट, 2020 रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...