Thursday, November 9, 2023

 दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होणार कारवाई

·         जिल्हा प्रशासनावतीने धडक तपासणी मोहिम सुरु


नांदेड (जिमाका) दि. 9 :- दिवाळी सणामुळे दुग्धजन्य पदार्थाची खरेदी, विक्री मोठया प्रमाणात होते. या कालावधीत दुध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अचानक धाड टाकून दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष पी.एस. बोरगावकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात दुध व दुधजन्य पदार्थातील होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती मार्फत जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 31 ऑक्टोबर रोजी शहरातील वजिराबाद भागातील जनप्रिया मिष्ठान भांडार, नांदेड येथे धाड टाकून दुध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी केली. या तपासणीत दोन दुग्धजन्य पदार्थ बासुंदी व खवा असे दोन पदार्थाचे नमुने घेवून शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...