Friday, July 12, 2019

संभाजी हंबर्डे यांचा सेवानिवृत्ती निरोप



नांदेड, दि. 12 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील संभाजी हंबर्डे हे नियत वयोमानानुसार जून 2019 मध्ये 23 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा नुकताच निरोप समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी श्री. हंबर्डे यांच्या सेवेचा लाभ महाविद्यालयाला झाला असे स्पष्ट करुन त्यांचा स्वभाव, काम करण्याची सचोटी याबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील डॉ. हारुन शेख, प्रा. सोळूंके, प्रा. नायगावकर, श्री. गच्चे, प्रा. डॉ. घोनशेटवाड यांनी हंबर्डे यांचे सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शाकेर, डॉ. मुरुमकर, हंबर्डे यांच्या पत्नी सौ. विमल हंबर्डे, मुलगा प्रा. संदीप व श्रीकृष्ण हंबर्डे, डॉ. कुलदीप पवार, डॉ. सजिवनी राठोड, श्रीमती राठोड, जाधव, ए. आर. जाधव, होळकर, सोनाळे आदी महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. घोनशेटवाड यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...