Wednesday, June 7, 2023

 शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- कपाशीला जो बाजार भाव मिळतो तो वाण पाहून मिळत नसून धाग्याची लांबी पाहून मिळतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी एका विशिष्ट वाणांचा आग्रह न धरता इतर उत्पादन वाढीचे सूत्र लक्षात घ्यावे. जसे की एकात्मिक कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापनकामगंध सापळे, सापळा पिके वापरणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 882000 कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होता. यावर्षी कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा मिळवून तेवढाच पुरवठा होणार आहे. कंपन्यांनी व विक्रेत्यांनी बियाणे विक्रीबाबत सविस्तर नियोजन करावे. तसेच याबाबतची माहिती लिखित स्वरूपात कृषी विभाग व कृषि विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. काही ठराविक वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या शेतकऱ्यांना कापुस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जसे उत्पादन वाढीच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. याबाबत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही होणार नाही यांची काळजी घ्यावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांनी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या 35 ते 40 व्या दिवशी एकरी चार कामगंध सापळे वापरुन कमी खर्चात बोंड अळीचे नियंत्रण करणे शक्य आहे. एकाच वाणाला महत्व दिल्याचे निदर्शनास आले तर संपूर्ण साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद कापूस बियाणे उत्पादक कंपन्यानी घ्यावी शेतकऱ्यांना वाणाच्या निवडीसाठी जमिनीचा प्रकारबागायत व कोरडवाहू क्षेत्र इत्यादी बाबत योग्य मार्गदर्शन व्हावे असेही जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...