Tuesday, December 4, 2018


शुक्रवारी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी
संकलन शुभारंभ, माजी सैनिकांचा मेळावा
        नांदेड, दि. 4 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2018-19  संकलन  शुभारंभ माजी सैनिकांच्या मेळावा शुक्रवार 7 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे सकाळी 11  वा. आयोजित केला आहे.  
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ संकलन समितीचे अध्यक्ष व  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या  हस्ते होणार असुन या प्रसंगी  समितीचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, भा.प्र.से, पोलीस अधिक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,  निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा उद्योग अधिकारी,  जिल्हा शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
              गतवर्ष  2017-18  साठी  शासनाने जिल्हयाला  35 लाख  50 हजार रुपये संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने 54 लाख 81 हजार 688 रुपयाचा निधी जमा करुन  155 टक्के पुर्ण केले आहे. या निधी संकलनासाठी जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था व नागरिकांनी मोलाचे कार्य करुन सढळ हाताने मदत केली आहे.  या  संकलन  शुभारंभ कार्यक्रमात ज्या कार्यालयाने दिलेले इंष्टाक पुर्ण  करुन निधी जमा केला आहे त्यांचा सत्कार  होणार असुन  जिल्हयातील विरनारी, विरपिता / विरमाता  यांचाही सत्कार करण्याचे आयोजित केले आहे.  यानिमित्ताने माजी सैनिकांचा मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. कार्यालय प्रमुखांनी व माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...