स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबीराचे बुधवारी आयोजन
नांदेड दि. 3 :- “उज्ज्वल
नांदेड” या मोहिमेअतंर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबिराचे आयोजन
बुधवार 5 डिसेंबर
2018 रोजी सकाळी 10 वा.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह
स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजन
करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय
सेतू समिती, नांदेड-वाघाळा
शहर महानगरपालिका यांचे
संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिराचे
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे हे राहणार आहेत. तर प्रमुख
पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय
शिंदे व डिवायएसपी अश्विनी शेंडगे
उपस्थित राहणार आहेत.
संतोष वट्टमवार
हे युपीएससी, एमपीएससी 2019 (CSAT) संयुक्त
पुर्व परीक्षा गणित या विषयावर
तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास
तिडके हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या
बालविकास प्रकल्प अधिकारी या परीक्षेच्या
अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी संतोष
वेणीकर यांचीही यावेळी उपस्थित राहणार
आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी
करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास
उपस्थित रहावे, असे आवाहन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष
ढोक यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment