Friday, March 6, 2020


राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान  अंतर्गत
कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
           
नांदेड दि. 6 :- जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी नांदेड आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन 2019-20 अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान या विषयांवरील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
       या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे  यांनी मागील खरीप हंगामामध्ये राबवलेल्या उपक्रमामुळे व शेतकऱ्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेबाबत केलेल्या जाणीवजागृतीमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कृषी सहायक यांनी गावनिहाय जमीन आरोग्य पत्रिकेचे सुपीकता नकाशे बनवून गावामध्ये शेतकऱ्यांना समजावून सांगावेत असे प्रतिपादन केले.
            वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञा श्रीमती गजभिये बी.आर.यांनी जमिनीमध्ये शाश्वतता टिकविणे काळाची गरज असून त्यासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.तसेच सेंद्रीय शेती चा वापर वाढवावा असे सुचविले.
कंधार तालुका कृषी अधिकारी देशमुख आर. एम.यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार हळद लागवड कशी करावी व उत्पादकतेत कशी वाढ करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना आलेले अनुभव कथन केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्रीमती गुंजकर यांनी जिल्ह्यामध्ये राबवित असलेल्या अभियानाबाबत माहिती दिली. अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत कर्मचारी यांना आवाहन केले.
    या  प्रशिक्षण कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी किनवट कदम बी.पी., देगलूर सोनटक्के एम.जी., कृषी उपसंचालक घुगे वाय. व्ही., तालुका कृषी अधिकारी किनवट -गायकवाड, देगलूर-शिंदे एस.आर., नांदेड-शिंगाडे, यांचेसह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांची उपस्थिती लाभली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जारीकोटे वसंत यांनी केले तर चिंतावार दत्तात्रय यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहायक अमित राठोड, पालेपवाड , चव्हाण, घुमनवाड,पाटील, सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...